Jalna : परतूर शहरात चक्क `पाकिस्तान` गल्ली ; नगर परिषदेचे डोके ठिकाणावर आहे का ?

सत्ताधाऱ्यांनी हा प्रकार मुद्दाम केला आहे का? कुठल्याही स्वाभीमानी व्यक्तीला किंवा मुस्लिमांना देखील आपल्या गल्लीचे नाव पाकिस्तान गल्ली असावे असे वाटणार नाही. (Jalna)
Partur Nagra Parishad, Jalna
Partur Nagra Parishad, JalnaSarkarnama

जालना : ज्या शत्रू राष्ट्राच्या कुरापतीमुळे आपला देश बेजार आहे, आमचे हजारो जवान मारले जात आहेत, देशात विघातक कारवाया, अतिरेक्यांचा उच्छाद सुरू आहे, त्या पाकिस्तानच्या नावाने आपल्या देशात एक पाकिस्तानी गल्ली अस्तित्वात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Jalna) जालना जिल्ह्यातील परतूर शहरात हा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मालमत्ता कर वसुलीसाठी परतूर नगरपरिषदेने (Municipal Council) दिलेल्या पावतीवर चक्क पाकिस्तान गल्ली असा उल्लेख करण्यात आल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. (Congress) नगर परिषदेचे डोके ठिकाणावर आहे का ? असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थितीत केला जात आहे. काॅंग्रेसची सत्ता असलेल्या नगर परिषदेने हा खोडसाळपणा मुद्दाम केला असून संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी माजी मंत्री तथा विद्यमान भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे.

ऐकावे ते नवलच असा काहीचा प्रकार परतुरमध्ये उघडकीस आला आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. कारण शत्रू राष्ट्राच्या नावाची म्हणजेच पाकिस्तान नावाची एक गल्ली परतूर शहरात असल्याचे नगर परिषदेच्या कारनाम्यामुळेच उघडकीस आले आहे. हा प्रकार समोर येताच लोकांमधून संताप व्यक्त होत आहे. सध्या देशात मंदिर, मशीद आणि भोंग्याचा वाद आणि त्यावरून राजकीय वातावरण तापलेले असतांनाच आता पाकिस्तान गल्ली सापडल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

परतुर नगर परिषदेच्या वतीने सध्या मालमत्ता कर वसुलीसाठी सर्वेचे काम सुरू आहे. या दरम्यान, शहरातील एका गल्लीला चक्क पाकिस्तानचे नाव असल्याचे उघडकीस आले. शनिमंदीर, प्रबुद्धनगर भागातील नागरिकांना नगर परिषदेच्या वतीने पाठवण्यात आलेल्या करवसुली नोटीसमध्ये पाकिस्तान गल्ली असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. हा प्रकार मुद्दाम खोडसाळपणातून करण्यात आला आहे? की मग अनवाधानाने झालेली चूक आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Partur Nagra Parishad, Jalna
Raosaheb Danve : फडणवीसांचा मार्ग मोकळा करण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रस्त्यावर..

मात्र यावरून राजकारण सुरू झाले असून माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी काॅंग्रेसवर निशाणा साधत नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्रात पाकिस्तान हवा आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. गेल्या २५-३० वर्षापासून नगर परिषदेवर काॅंग्रेसची सत्ता आहे, आता निवडणुका तोंडावर असल्याने सत्ताधाऱ्यांनी हा प्रकार मुद्दाम केला आहे का? कुठल्याही स्वाभीमानी व्यक्तीला किंवा मुस्लिमांना देखील आपल्या गल्लीचे नाव पाकिस्तान गल्ली असावे असे वाटणार नाही. या प्रकाराला कोण जबाबदार आहेत, याचा शोध तातडीने घेऊन संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी देखील लोणीकर यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com