Jarange Patil News
Jarange Patil NewsSarkarnama

Maratha Aarakshan Live : मनोज जरांगेंचे उपोषण मागे, मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

Eknath Shinde at Jalna : जरांगे यांनी १७ व्या दिवशी उपोषण सोडले.

Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षणाच्या मागणीवर सोळा दिवसांपासून ठाम असलेले मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.

Jarange Patil News
Sarkarnama Podcast : लातूरकरांचा चिमटा, मातब्बराचा पराभव

मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू होते. अखेर मुख्मयंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटी येथे जात मनोज जरांगे यांचे उपोषण सोडले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत रावसाहेब दानवे, संदीपान भुमरे, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, अर्जुन खोतकर यांच्यासह सरकारचे दोन अधिकारीदेखील चर्चेसाठी उपस्थित आहेत.

जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री यांच्यात जवळपास 10 मिनिटं चर्चा झाली. त्यांच्या या चर्चेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्यूस पिऊन जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण १७ व्या दिवशी सोडलं.

मुख्यमंत्री यांच्यासोबत जरांगे पाटलांची दहा ते पंधरा मिनिटे चर्चा झाली. या चर्चेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हातून ज्यूस पिऊन जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं. जरागेंनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी सरकार आणि जरागे पाटील यांच्या शिष्टमंडळामध्ये अनेक बैठका झाल्या. अर्जुन खोतकर, गिरीश महाजन यांनीही त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती, पण जरांगे आपल्या उपोषणावर ठाम होते.

Edited By : Mangesh Mahale

Jarange Patil News
MLA Disqualification Case : राऊतांचे भाकीत; म्हणाले, 'अजितदादांसोबतचे आमदारही अपात्र होतील' ; नार्वेकरांनी घटनेशी द्रोह केला...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in