Jalna News : भूसंपादनाचा मोबदला ईडीकडे जमा करा, गोरंट्याल यांच्या खेळीने खोतकर घायाळ..

Kailas Gorantyal : शेतकरी, शेअर होल्डर, कर्मचारी हे कारखान्याचे खरे मालक आहेत. त्यामुळे संपादित जमिनीचा मोबदला त्यांनाच मिळाला पाहिजे.
Mla Gorantyal Meet Msrdcs Mopalwar News, Jalana
Mla Gorantyal Meet Msrdcs Mopalwar News, JalanaSarkarnama

Marathwada : नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाला नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांना जोडण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. यासाठी होणाऱ्या भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी कोट्यावधींची तरतूद देखील करण्यात आली. समृद्धीच्या या मार्गामध्ये (Jalna) जालना जिल्ह्यातील रामनगर साखर कारखान्याची जमीन जाणार आहे. या जमीनीचे भूसंपादन करून त्यापोटी कोट्यावधी रुपये संबंधित कारखान्याला मिळणार होते.

Mla Gorantyal Meet Msrdcs Mopalwar News, Jalana
Sanjay Shirsat : सत्तारांचे मंत्रीपद राहिले काय ? अन् गेले काय ? माझा त्याच्याशी संबंध नाही..

परंतु भूसंपादनापोटी मिळणारा मोबदला हा जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा ईडीकडे (Ed) जमा करण्यात यावा, अशी मागणी या कारखान्याला जमीन दिलेले शेतकरी, सभासद व इतरांनी केली आहे. या संदर्भात दोन दिवसांपुर्वी काॅंग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या काही सभासद, शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून निवेदन दिले होते.

त्यानंतर आज महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे सर्वेसर्वा राधेश्याम मोपलवार यांची देखील गोरंट्याल व इतरांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन या मागणीचे निवेदन देवून चर्चा केली. यावर मागणीवर सकारात्मक विचार करुन योग्य निर्णय घेण्याचे आश्वास मोपलवार यांनी संबंधितांना दिले. जालना-नांदेड समृद्धी महामार्गासाठी रामनगर साखर कारखान्याची जमीन संपादित करण्यात येणार आहे.

पंरतु या संपादित जमिनीचा मोबदला ईडी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करा, अशी मागणी समोर आली आहे. शेतकरी, शेअर होल्डर आणि कर्मचारी हे या कारखान्याचे खरे मालक आहेत. त्यामुळे संपादित जमिनीचा मोबदला त्यांनाच मिळाला पाहिजे, अशी भूमिका आमदार कैलास गोरंटयाल यांनी घेतली. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर आज रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची देखील गोरंट्याल व शिष्टमंडळाने भेट घेतली.

मोपलवार यांनी जालना-नांदेड समृद्धी महामार्गाबाबत बैठक घेतली त्या दरम्यान रामनगर साखर कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले. मोपलवार यांनी कारखान्याच्या संपादित जमिनीचा मोबदला ईडी अथवा जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला जाईल असे आश्वासन दिले असल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले आहे.

Mla Gorantyal Meet Msrdcs Mopalwar News, Jalana
Bjp News : कराडांचं असं झालं ; करायला गेले शक्तीप्रदर्शन झाली फटफजिती..

गोरंट्याल यांनी ही खेळी करून आपले राजकीय विरोधक माजी मंत्री व रामनगर कारखान्याचे भागीदार अर्जून खोतकर यांच्या अडचणीत वाढ केली आहे. गेल्या वर्षी याच कारखान्याच्या खरेदी-विक्री व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत ईडीने अर्जून खोतकर व इतरांची चौकशी केली होती. आता गोरंट्याल यांनी याच कारखान्याच्या जमीनीच्या भूसंपादनाचा मोबदला थेट जिल्हाधिकारी अथवा ईडीकडे जमा करण्याची मागणी लावून धरत, खोतकरांना दणका दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in