Jalna News : अधिकाऱ्यावर शाईफेक करणाऱ्या भाजप नगरसेवकाला एक वर्षाची कैद..

District Court : जिल्हा सत्र न्यायालयात सरकारी पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले होते.
Jalna District Court News
Jalna District Court NewsAurangabad

Marathwada News: चार वर्षापुर्वी जालना नगर परिषदेतील एका अधिकाऱ्याला धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी व अंगावर शाई फेकल्याच्या प्रकरणात (BJP) भाजप नगरसेवकाला जिल्हा व सत्र न्यायालयाने एक वर्ष साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.

Jalna District Court News
Jalna Political : गोरंट्याल-खोतकरांकडून एकमेकांचे वस्त्रहरण ; राजकारण तापले..

ज्ञानेश्वर रावसाहेब ढोबळे असे या नगरसेवकाचे नाव असून शासकीय कामात अडथळा आणणे, अधिकाऱ्यास जीवे मारण्याची धमकी देत धक्काबुक्की केल्याप्रकरणी त्याच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल होता. (Jalna) संपुर्ण प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात (Court) दोषारोपपत्र दाखल केले होते.

नुकतीच या प्रकरणाची सुनावणी झाली, तेव्हा प्रथम वर्ग न्यायाधीश बी.एस.गोरे यांनी ज्ञानेश्वर ढोबळे यास विविध कलमांतर्गत १ वर्षाची साधी कैद, २ हजार रुपये दंड, तसेच सहा महिन्यांची साधी कैद व १ हजार रुपये दंड व तिसऱ्या कलमांतर्गत एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

ज्ञानेश्वर रावसाहेब ढोबळे या नगरसेवकाने २ जून २०१८ रोजी पालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर हे स्थायी समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीला जात असताना त्यांना रस्त्यात अडवून धक्काबुकी केली. एवढेच नाही तर त्यांच्या अंगावर शाई फेकली.

त्यामुळे या प्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्या तक्रारी वरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर जिल्हा सत्र न्यायालयात सरकारी पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणावर काल जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल देताना आरोपी नगरसेवक ज्ञानेश्वर रावसाहेब ढोबळे याला एक वर्षाची कैद व एक हजार रुपये दंडची शिक्षा सुनावली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com