
Marathwada Political News : अंतरवाली सराटी येथील आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला आणि त्यानंतर त्यांचे जालना जिल्ह्यात उमटलेले तीव्र पडसाद पाहता उद्यापासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. (Jalna News) १७ सप्टेंबर म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनाच्या रात्री १२ वाजेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. उद्या, सोमवारी सकाळी सहा वाजेपासून जमावबंदी आदेश देण्यात आले आहेत.
अप्पर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी यासंबंधिचे आदेश दिले. (Marathwada) जालन्यात मराठा आरक्षणाच्या निमित्ताने विविध संघटनाकडून आंदोलने, रास्तारोका, उपोषण, आत्महदहनाचे प्रयत्न तसेच गाड्या जाळण्याचे प्रकार सुरू आहेत. (Jalna) या शिवाय विविध संघटना, राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतांना दिसत आहेत.
या पार्श्वभूमीवर कलम (३७) १ अन्वये सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे, लाठ्या, बंदूक, तलवारी, भाले, चाकू आणि शरीरास इजा अथवा अपाय करणाऱ्या वस्तू बाळगता येणार नाहीत. (Maratha Reservation) तसेच दगड एकत्रित गोळा करून ठेवता येणार नाही, जवळ बाळगता येणार नाहीत. व्यक्ती किंवा त्याच्या प्रतिकात्मक शवाचे प्रदर्शन करता येणार नाही. भाषणातून व्यक्तीच्या किंवा समूहाच्या भावना दुखावता येणार नाहीत.
तसेच गाणे किंवा वाद्याच्या माध्यमातून कोणाच्या भावना दुखावता येणार नाहीत. आवेशपूर्ण भाषण, अंगविक्षेप अराजक माजेल अशी चित्रे, निशाणे, घोषणापत्रे वस्तू बाळगता येणार नाहीत, असे जमावबंदी आदेशात नमूद करण्यात आले आहे. जमावबंदीच्या आदेशामुळे श्रीकृष्ण जयंती, दहीहंडी आणि पोळा तसेच १७ सप्टेंबरच्या मुक्तीसंग्राम दिनानिमित्त निघणाऱ्या मिरवणुका आणि इतर कार्यक्रमांवर देखील गंडांतर आले आहे.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.