Jalna : ईडीच्या कारवाईपुढे मी झुकणार नाही, न्यायालयात जाणार..

एकीकडे मंत्री, आमदारांची बंडखोरी तर दुसरीकडे अनिल परब, अर्जून खोतकर सारख्या नेत्यांभोवती ईडीचा फास अशा दुहेरी चक्रात शिवसेना अडकली आहे. (Shivsena)
Shivsena Ex. State Minister Arjun Khotkar On ED Action
Shivsena Ex. State Minister Arjun Khotkar On ED ActionSarkarnama

जालना : रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या जमीन,मशिनरी जप्ती संदर्भात ईडीने काढलेली ऑर्डर चुकीची आहे.(Jalna) हा त्यांच्या प्रक्रियेचा भाग आहे. पण मी ईडी कारवाई पुढे झुकणार नाही या आदेशा विरोधात न्यायालयात दाद जाणार, असे शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी स्पष्ट केले.(ED Action)

राज्यात सत्ता संघर्ष सुरू असतांना ईडीने काल शिवसेनेचे (Shivsena) माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या अर्जून शुगर्सने खरेदी केलेल्या रामनगर सहकारी साखर कारखाना प्रकरणी कारवाई केली. यात साखर कारखान्याची जागा, यंत्रसामुग्री अशी ७८ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.

एकीकडे मंत्री, आमदारांची बंडखोरी तर दुसरीकडे अनिल परब, अर्जून खोतकर सारख्या नेत्यांभोवती ईडीचा फास अशा दुहेरी चक्रात शिवसेना अडकली आहे. साखर कारखान्या संदर्भात ईडीने काढलेली ऑर्डर हा त्यांच्या प्रक्रियेचा एक भाग असून या आदेशा विरोधात मी न्यायालयात दाद मागणार असल्याचे खोतकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.

खोतकर म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, मी दबावाला बळी पडणारा, दबणारा माणूस नाही. मी कुणालाही घाबरत नाही, सध्या देशात आणि राज्यात ईडीचे काय सुरू आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे.

Shivsena Ex. State Minister Arjun Khotkar On ED Action
Aurangabad : सत्तार थेट गुवाहाटीतून सिल्लोडला येणार, समर्थकांसमोर भाषणही ठोकणार..

ईडीच्या कारवाईमागे कोण आहे ? हे देखील सर्वांना माहित आहे. पण मी या सर्व कारवाईच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार आहे. मला आशा आहे की मी चुकीचे काहीही केलेले नाही, त्यामुळे न्याय नश्चित मिळेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com