Jalna District :असे काय घडले, की महिलेने चार लेकरांसह मृत्यूला कवटाळले..

रोजच्याच भांडणाला कंटाळलेल्या गंगासागरने आत्महत्या करण्याचे ठरवून गुरूवारी दुपारी आपल्या चार लेकरांसह घुंगर्डे हदगाव शिवारातील शेत गाठले. (Jalna District)
Suicide in Jalna District

Suicide in Jalna District

Sarkarnama

जालना : घरगुती वादातून चार लेकरांसह एका महिलेने विहिरीत उडी घेउन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी (ता. ३०) रात्री घुंगर्डे हादगाव (ता. अंबड जि. जालना ) येथे घडली. (Jalna) गोंदी पोलिस ठाण्यात या प्रकरणाची नोंद घेण्यात आली. (Marathwada) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे.

दारूच्या व्यसनामुळे एखाद्या हसत्या-खेळत्या संसाराची कशी राखरांगोळी होते, याची अनेक उदाहरणं आपण समाजात पाहतो. (Farmer Family) अशाच एका व्यसनी पतीच्या रोजच्या त्रासाला कंटाळून एका महिलने आपल्या पोटच्या चार लेकरांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची ह्दयद्रावक घटना जालना जिल्ह्यात घडली आहे.

घुंगर्डे हादगाव येथील अत्यल्प भूधारक शेतकरी ज्ञानेश्‍वर प्रल्हाद अडाणी व गंगासागर हे दांपत्य आपल्या चार मुलांसह राहात होते. ज्ञानेश्‍वरला दारूचे व्यसन असल्याने त्याचे पत्नी गंगासागर बरोबर नेहमीच वाद होत असत. गुरूवारीही या दोघा पतीपत्नीत वाद झाला.

रोजच्याच भांडणाला कंटाळलेल्या गंगासागरने आत्महत्या करण्याचे ठरवून गुरूवारी दुपारी आपल्या चार लेकरांसह घुंगर्डे हदगाव शिवारातील शेत गाठले. दिवसभर शेतात राहून संध्याकाळी सातच्या दरम्यान गंगासागर हिने चारही लेकरांसह विहिरीत उडी घेउन आत्महत्या केली.

दरम्यान शेतात गेलेली पत्नी व मुले घरी न परतल्याने नातेवाइकांनी तिचा शोध सुरू केला होता. पण त्यांचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. शुक्रवारी सकाळी नातेवाईक शोध घेत शेताशेजारील विहिरीजवळ आले असता त्यांना पाचही मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले.

<div class="paragraphs"><p>Suicide in Jalna District</p></div>
निलंगेकरांचे पत्र, अमित देशमुखांकडून दखल अन् मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू

यात गंगासागर अडाणी (वय ३१) ईश्‍वरी अडाणी (वय १३), भक्‍ती (वय ११), अक्षरा (वय ९) व युवराज (वय ७) या पाच जणांचा समावेश होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, गोंदी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, सहायक फौजदार एल. व्ही. चौधरी, एस. पी. कुटे यांनी घाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढले.

घटनास्थळीच गोंदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बीरादार, डॉ. पायल राऊत चालक अन्वर पटेल, परिचारक भास्कर पाष्टे यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले.

गोंदी पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन पती ज्ञानेश्‍वर अडाणी याला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. गंगासागर हीच्या आईसह नातेवाइकांनी एकच टाहो फोडल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com