कोरोनाची चौथी लाट जुलैमध्ये ? आरोग्यमंत्र्यांनीच सांगितली ही कारणे...

कोरोनाची चौथी लाट ही जून, जुलैमध्ये येण्याची शक्यता गृहित धरून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण वाढविणे गरजेचे आहे. कोरोनाची चौथी लाट कोरोना प्रतिबंधात्मक लसच रोखू शकते. (Rajesh Tope)
Health Minister Rajesh Tope
Health Minister Rajesh TopeSarkarnama

जालना : कोरोनाची चौथी लाट जून-जुलैमध्ये येण्याची शक्यता आहे. परंतु, राज्यातील नागरिकांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. (Corona) त्यामुळे या लाटेचा अधिक परिणाम जाणवणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सोमवारी (ता. नऊ) जालना येथे आयोजित पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

गेल्या महिन्यात राज्यात व देशात कोरोनाचे रुग्ण अचानक वाढायला सुरूवात झाली होती. परंतु याचे प्रमाण कोरोनाच्या दुसऱ्या, तिसऱ्या लाटेच्या तुलनेत अत्यअल्प होते. (Jalna) त्यामुळे जनतेला कोरोनाची नियम पाळण्याचे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले होते. (Maharashtra) राज्य सध्या मास्क मुक्त आहे, परंतु कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे राज्यात पुन्हा मास्क सक्ती करावी लागते की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

आता पुन्हा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. जालना येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना टोपे म्हणाले, १५ ते १७ वयोगटातील लसीकरणात जालना जिल्ह्याचा राज्यात १३ वा नंबर आहे. तसेच १२ ते १४ या वयोगटातील मुलांचे जिल्ह्यात ८० टक्के लसीकरण झाले आहे. यात देखील जिल्ह्याचा राज्यात सातवा क्रमांक आहे.

Health Minister Rajesh Tope
Aurangabad : भाजप कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करत अससल्याचा शिवसेनेचा आरोप

कोरोनाची चौथी लाट ही जून, जुलैमध्ये येण्याची शक्यता गृहित धरून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण वाढविणे गरजेचे आहे. कोरोनाची चौथी लाट कोरोना प्रतिबंधात्मक लसच रोखू शकते. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी ज्या भागातील नागरिक येण्यास तयार नाहीत, अशा ठिकाणी जाऊन आरोग्य विभागाकडून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करणे गरजेचे आहे. तसे निर्देशही आरोग्य विभागाला दिले आहेत.

शिवाय सध्या मास्क सक्ती नसली तर मास्क वापरण्याचे आवाहन शासनाकडून केले आहे. पुढील काळात जर कोरोना संसर्ग वाढ कमी होत असल्याची सकारात्मक आकडेवारी आली तर मास्क संदर्भातील पुढील निर्णय घेतला जाईल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com