Jalna : सुटीवर आलेला जवान टिपू सुलतान जयंतीत पिस्तुल घेऊन नाचला, गुन्हा दाखल..

अंबड शहरातील मेहबूबनगर परिसरात राहत असलेल्या या जवानावर अंबड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Jalna News)
Fir Filed News Jalna
Fir Filed News JalnaSarkarnama

जालना : गेल्या काही वर्षापासून राज्यात टिपू सुलतान जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जात आहे. यावरून अनेकदा वाद देखील निर्माण झाले, परंतु आता दरवर्षी ही जंयती साजरी केली जाते. जालना जिल्ह्यातील अंबड शहरात काल टिपू सुलतान जंयती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. तरुणांचा जल्लोष सुरू असतांनाच एका सैन्य दलातील जवानाने त्याच्याकडे असलेले पिस्तूल काढत मित्राच्या खांद्यावर बसवून ते नाचवले.

Fir Filed News Jalna
Bjp : लव्ह जिहाद प्रकरणातून धर्मांतराचा डाव ; सावेंचा खासदार इम्तियाज यांच्यावर आरोप..

या प्रकरणाची माहिती कळताच पोलिसांनी या जवानाला ताब्यात घेत चौकशी केली आणि त्याच्याकडील पिस्तुल जप्त केले. (Jalna) या प्रकरणी संबंधित जवानावर अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Fir Filed) सायंकाळी अंबड शहरातून टिपू सुलतान जंयती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती.

दरम्यान सैन्यदलात कार्यरत असलेला जवान शेख बिलाल शेख दिलावर याने आपल्या जवळ असलेले पिस्तुल काढले आणि तो मित्राच्या खांद्यावर बसून ते नाचवत होता. अर्धा तास त्याचा हा प्रकार सुरू असतांना पोलिसांचे त्याच्याकडे लक्ष गेले.

पोलिसांनी या जवानाची विचारपूस करत त्याचे पिस्तुल जप्त केले. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्याने आपले नाव शेख बिलाल शेख दिलावर असून आपण सुट्टीवर असल्याचे सांगितले. अंबड शहरातील मेहबूबनगर परिसरात राहत असलेल्या या जवानावर अंबड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक शिरीष हुंबे हे करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in