Jalna : तुमच्यासारख्या चिल्लर माणसाने मुख्यमंत्र्यांसारख्या मोठ्या माणसाबद्दल बोलू नये..

मुख्यमंत्र्यांबद्दल बोलून त्यांनी आपला चिल्लरपणा दाखवला आहे, अशा चिल्लर माणसाने मुख्यमंत्र्यांसारख्या मोठ्या माणसाबद्दल बोलणे शोभत नाही. (Arjun Khotkar)
Jalna : तुमच्यासारख्या चिल्लर माणसाने मुख्यमंत्र्यांसारख्या मोठ्या माणसाबद्दल बोलू नये..
Arjun Khotkar-sadabhau KhotSarkarnama

जालना : सदाभाऊ खोत यांना आता भाऊ म्हणायलाही कसेतरी वाटते. ज्या राजु शेट्टींनी शेतकऱ्यांसाठी संघटन उभे केले त्यांच्याच पाठीत आमदारकीसाठी खंजीर खुपसणारे सदाभाऊ हेच खऱ्या अर्थाने चिल्लर आहेत. (Jalna) अशा चिल्लर माणसाने मुख्यमंत्र्यांसारख्या मोठ्या व्यक्तीबद्दल बोलू नये, अशा शब्दात माजी मंत्री अर्जून खोतकर यांनी सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.

जालना जिल्ह्यातील शेतकरी संवाद दौऱ्या दरम्यान, वाटुर फाटा येथे सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करतांना तो चिल्लरवाला माणूनस असल्याचे म्हटले होते. (Shivsena) एवढेच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार,आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावरही खोत यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका आणि आरोप केले होते. (Maratahwada)

मुख्यमंत्र्यांना चिल्लर म्हणणाऱ्या खोत यांचा अर्जून खोतकर यांनी आज समाचार घेतला. प्रसार माध्यमाशी बोलतांना खोतकर म्हणाले, सदाभाऊ खोत यांनी काल ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांवर टीका केली ते पहाता त्यांना आता भाऊ म्हणायला देखील कसेतरी वाटत आहे. ज्यांनी आमदारकीसाठी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार.

Arjun Khotkar-sadabhau Khot
राज ठाकरेंना विरोध नको, अयोध्येला येऊ द्या!

मुख्यमंत्र्यांबद्दल बोलून त्यांनी आपला चिल्लरपणा दाखवला आहे, अशा चिल्लर माणसाने मुख्यमंत्र्यांसारख्या मोठ्या माणसाबद्दल बोलणे शोभत नाही. स्वतःला शेतकरी नेते म्हणवणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्या बुद्धीची मला किव येते.

खरतर त्यांच्या बुद्धीची तपासणीच केली पाहिजे. आमदारकीची टर्म संपत आली असल्याने पुन्हा ती मिळावी म्हणून त्यांनी असे प्रकार सुरु केले आहेत. मात्र तुमच्यासारख्या चिल्लर माणसाने इतक्या मोठ्या मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्रावर बोलणं योग्य नाही, असेही खोतकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.