"सर, तुम्हाला मी गुरु मानले, तुम्हीच माझा संसार उद्ध्वस्त केला," ; ऑडिओ क्लिपमुळे पोलिस दलात खळबळ

Maharashtra police : एका पोलिस कर्मचाऱ्याने त्यांच्याच पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याचे आणि त्याच्या पत्नीचे अनैतिक संबध असल्याचे सांगत व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आहे.
Maharashtra police
Maharashtra police sarkarnama

जालना : सध्या जालना (jalana) जिल्ह्यात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिपमुळे एकच खळबळ उडाली आहे. या क्लिपच्या माध्यमातून एका पोलिस कर्मचाऱ्याने त्यांच्याच पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याचे (Maharashtra police) आणि त्याच्या पत्नीचे अनैतिक संबध असल्याचे सांगत व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आहे. या प्रकारामुळे जालना जिल्ह्यात पोलीस दलाची अब्रू वेशीला टांगली आहे.

गेल्या तीन दिवसापासून व्हायरल होणाऱ्या वेगवेगळ्या ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिपने जिल्ह्यात सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. "सर, मी तुमच्यावर विश्वास ठेवला, तुम्हाला मी गुरु मानले,तुम्ही माझा संसार उद्ध्वस्त केला," असे हा कर्मचारी पोलिस अधिकाऱ्याला सांगत असल्याचे क्लिपमध्ये दिसते.

या व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिपमधून या पोलिस शिपायाने आपण कार्यरत असलेल्या पोलिस ठाण्याच्याच पोलिस निरीक्षक आणि त्यांच्या पत्नीला संबंध ठेवताना रंगे हात पकडल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आपल्याला काही लोकांनी मारहाण केली असल्याचं ही त्यांनी व्हायरल झालेल्या ऑडिओ मध्ये म्हटल आहे. या बाबत आपण वरिष्ठांकडे तक्रार केली आहे, पण त्यानंतरही कुठलीच कारवाई केली जात नसल्याचा आरोप त्याने केला आहे.

पोलिस निरीक्षक आपल्या पत्नीला पैशाचे आमिष दाखवून हे कृत्य करत असल्याचा आरोप त्याने या ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिपतून केला आहे. अवैध दारू,वाळू माफिया यांच्याविरुध्द धडक कारवाई करणाऱ्या आणि कीर्तन करणाऱ्या पोलिस निरीक्षकाविरुद्ध हे आरोप करण्यात आले आहे, त्यामुळे सोशल मीडियावर चर्चाना उधाण आले आहे. त्यातच गेल्या तीन दिवसापासून रोज वेगवेगळ्या क्लिप जिल्हाभर व्हायरल होत असल्यानं नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत. "सरकारनामा' या क्लिपची पुष्टी करीत नाही.

Maharashtra police
Pankaja Munde यांना सत्तेचा प्रसाद मिळेल का ? ; फडणवीसांच्या गणपतीचे घेतले दर्शन

या क्लिपनंतर पोलिस निरीक्षक रजेवर गेल्याची माहिती समोर आली आहे. या पोलिस शिपाई आणि पोलिस निरीक्षकाच्या संभाषण क्लिपही व्हायरल होत आहे. या बाबत आरोप केल्या जात असलेल्या पोलिस निरीक्षकांकडून हा शिपाई दारूच्या आहारी गेल्याने आणि त्यांच्याकडून राईटर पद काढून घेतल्याने तो असले आरोप करत असल्याचा आरोप पोलिस निरीक्षकाने केला आहे. एकीकडे जिल्ह्यात जांब समर्थ येथील मूर्तीचोरी प्रकरण गाजत असताना एक पोलिस शिपाई सोशल मीडियावर त्यांच्याच पोलीस ठाण्याच्या अधिकाच्यावरच हे गंभीर आरोप करत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com