जैस्वाल-तनवाणी वैयक्तिक आयुष्यातील मित्र, राजकारणात मात्र एकमेकांचे विरोधक

जैस्वालांकडील महानगरप्रमुख पद तनवाणी यांच्याकडे आल्यानंतर लगोलग एकनाथ शिंदे यांनी देखील जैस्वालांना शिंदे गटाचे महानगरप्रमुख पद बहाल केले. (Mla Pradip Jaiswal)
Mla Pradeep Jaiswal- Kishanchand Tanwani New Aurangabad
Mla Pradeep Jaiswal- Kishanchand Tanwani New AurangabadSarkarnama

औरंगाबाद : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबाद महानगरप्रमुख पदी किशनचंद तनवाणी यांची नियुक्ती केली. (Shivsena) शिवसेनेत असतांना आणि आता शिंदे गटातसोबत गेलेल्या मध्यचे (Pradeep Jaiswal) आमदार प्रदीप जैस्वाल यांच्याकडे आधी ही जबाबदारी होती. तनवाणी यांचा राजकीय प्रवास हा शिवसेना, भाजप आणि आता परत शिवसेना असा राहीला आहे. तर प्रदीप जैस्वाल हे सुरवातीपासूनच शिवसेनेत होते, परंतु शिंदे बंडात त्यांनी उडी घेतली आणि त्यांच्यावर दुसऱ्यांदा गद्दारीचा शिक्का बसला.

या आधी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने प्रदीप जैस्वाल यांना डावलून विकास जैन यांना उमेदवारी दिल्यानंतर जैस्वालांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकली. (Aurangabad) त्यानंतर ते पुन्हा शिवसेनेत परतले पण वैयक्तिक आयुष्यात जिवलग मित्र असलेल्या किशनचंद तनवाणी यांच्यामुळेच जैस्वाल यांचा २०१४ मध्ये पराभव झाला. युती तुटल्यामुळे तनवाणी यांना भाजपने उमेदवारी दिली आणि हिंदू मताचे विभाजन होऊन एमआयएमने ही जागा जिंकली होती.

हा सगळा इतिहास पुन्हा सांगण्याचे कारण म्हणजे उद्धव सेनेचे किनशचंद तनवाणी आणि शिंदे गटाचे प्रदीप जैस्वाल आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपमध्ये शहराध्यक्ष म्हणून काम केलेले तनवाणी दोन वर्षापुर्वी स्वगृही परतले. पण कोरोनामुळे लांबलेल्या महापालिकेच्या निवडणुकांनी त्यांच्या खेळीला खिळ बसली. आता शिंदे गटाचे बंड त्यांच्या पथ्यावर पडले आणि तनवाणी यांना उशीरा का होईना पक्षाने महानगरप्रमुख पदाची स्वतंत्र जबाबदारी दिली.

प्रदीप जैस्वाल आणि तनवाणी हे वैयक्तिक आयुष्यात एकमेकांचे घनिष्ठ मित्र आहेत. दोघांमध्ये कौटुंबिक आणि व्यावसायिक संबंध देखील आहेत. दरवर्षी तिरुपती बालाजीला दोघेही सहकुटुंब दर्शनाला जात. दोघांची राजकीय कारकीर्द देखील एकाच पक्षात घडली. जैस्वाल हे सरळ, साधे पण तितकेच आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. तर निवडणूक यंत्रणा राबवून आपल्या चाली यशस्वी करण्यात तनवाणी यांचा हातखंडा आहे.

जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तनवाणी यांनी आपल्या याच चाणाक्ष खेळीच्या जोरावर काॅंग्रेसच्या अब्दुल सत्तारांचा पराभव केला होता. परंतु पक्षांतर्गत गटबाजीमुळे त्यांनी मध्यंतरी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपची वाट धरली होती. तनवाणी आता पुन्हा शिवसेनेत सक्रीय झाले आहेत, पद मिळायला दोन वर्ष वाट पहावी लागली असली तरी योग्यवेळी जबाबदारी मिळल्याचे तनवाणी सांगतात.

Mla Pradeep Jaiswal- Kishanchand Tanwani New Aurangabad
देशाचा जीडीपी घसरतोय अन् डीपी वाढतोय; नान पटोलेंचा मोदींना टोला...

महापालिका निवडणुकीची सगळी सुत्र या नव्या जबाबदारीमुळे आता तनवाणी यांच्याकडे आली आहे. याचा शिवसेनेला निश्चित फायदा होऊ शकतो. शिवसेनेत उभी फूट पडलेली असतांना जुन्या-नव्या शिवसैनिकांची मोट बांधून महापालिका निवडणुकी पुन्हा एकदा शिवसेनेला नंबर एकचा पक्ष बनवण्याची जबाबदारी स्थानिक नेत्यांप्रमाणेच तनवाणी यांच्यावर देखील असणार आहे. जैस्वालांकडे असलेले महानगरप्रमुख पद तनवाणी यांच्याकडे आल्यानंतर लगोलग एकनाथ शिंदे यांनी देखील जैस्वालांना शिंदे गटाचे महानगरप्रमुख पद बहाल केले.

त्यामुळे वैयक्तिक आयुष्यातील हे दोघे मित्र आता संघटनात्मक पातळीवर एकमेकांशी दोन हात करतांना दिसतील. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आजचीच राजकीय परिस्थिती कायम राहिली तर पुन्हा २०१४ चा रिकॅप देखील पहायला मिळू शकतो. जैस्वाल-तनवाणी एकमेकांच्या विरोधात लढले तर निकाल काय लागेल हे वेगळे सांगायला नको.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com