Shivbhojan Thali : गोरगरिबांच्या तोंडचा घास पळवण्याचे पाप करू नका..

कुठे भ्रष्टाचार झाला असेल, तक्रारी असतील तर तेथील केंद्र बंद करण्यास विरोध असण्याचे कारण नाही. परंतु सरकट योजना बंद करणे चुकीचे ठरेल. (Opposition Leader Ambadas Danve)
Opposition Leader Ambadas Danve-Cm Eknath Shinde News
Opposition Leader Ambadas Danve-Cm Eknath Shinde NewsSarkarnama

औरंगाबाद : गोरगरिब, कामगार, मजुर यांना पोटाला दोन घास मिळावे या चांगल्या हेतूने सुरू केलेली शिवभोजन थाळी बंद करण्याच्या हालचाली शिंदे-फडणवीस सरकारकडून सुरू असल्याचे समजते. (Shivbhojan Thali) माझे या सरकारला सांगणे आहे, गोरगरिबांच्या तोंडचा घास पळवण्याचे पाप करू नका. भ्रष्टाचार झाला असे तुम्हाला वाटत असेल तर जिथे झाला तिथे ही योजना बंद करा, याला कोणाची हरकत असणार नाही.

पण सरसकट योजना बंद केली तर मजूर, कामगार आणि गोरगरिबांची उपसमार होईल, अशा शब्दात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवभोजन थाळी बंद करू नये, अशी मागणी केली आहे. (Aurangabad) औरंगाबादेत अंबादास दानवे यांच्या पुढाकारातून सर्वात आधी शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. (Marathwada) अगदी केवळ दहा रुपयात पोटभर जेवण देण्याची ही योजना आजही सुरू आहे.

कालांतराने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर शिवभोजन थाळी ही योजना राज्यभरात लागू करण्याचा निर्णय घेतला होता. उद्धव ठाकरे यांना ही संकल्पना आवडली होती. दहा रुपयांत पोटभर जेवण देणारी ही योजना आणि त्याची केंद्र आघाडी सरकारने राज्यभरात उघडली. या केंद्रांच्या माध्यमातून हजारो गरीब, मजुर, कामगार, कष्टकरी या योजनेचा लाभ घेऊन आपली भूक भागवत आहेत.

कोरोना काळात जेव्हा लाॅकडाऊन होते, तेव्हा आणि अनेकांचे रोजगार हिरावले गेले त्या काळात याच शिवभोजन थाळीने लाखो गरीबांना तारले होते. राज्य सरकारने कोरोना काळात ५ रुपयांत पोटभर जेवण देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु राज्यातील सत्तांतरानंतर महाविकास आघाडी सरकारच्या अनेक योजनांप्रमाणेच शिवभोजन थाळी देखील बंद होण्याच्या मार्गावर आहे.

Opposition Leader Ambadas Danve-Cm Eknath Shinde News
Chandrakant Khaire : पालकमंत्र्यांना कुत्रंही विचारणार नाही..

या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा दावा करत आढावा घेऊन योजना पुढे सुरू ठेवायची की नाही? याचा निर्णय घेतला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, असा निर्णय जर राज्य सरकार घेत असेल तर तो अत्यंत दुर्दैवी ठरेल. शिवभोजन थाळी ही राज्यातील गोरगरिब, कष्टकरी, मजूर, कामगार अशा लोकांसाठी राबवली जाते.

दोन सुखाचे घास त्यांच्या पोटात जातात यापेक्षा दुसरा कुठलाही हेतू ही योजना राबवतांना नव्हता. त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे, की त्यांनी ही योजना बंद करू नये. गोरगरिबांच्या पोटाला मिळणारे दोन घास पळवण्याचे पाप करू नये. कुठे भ्रष्टाचार झाला असेल, तक्रारी असतील तर तेथील केंद्र बंद करण्यास विरोध असण्याचे कारण नाही. परंतु सरकट योजना बंद करणे चुकीचे ठरेल, उलट दहा रुपयांऐवजी शिवभोजन थाळी पाच रुपयात द्या, अशी मागणीही दानवे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com