Manoj Jarange Criticized Fadanvis : गृहमंत्रीपदावर बसलेल्या व्यक्तीला खोटं बोलणं शोभत नाही ; मनोज जरांगेंनी फडणवीसांचे पितळ उघडे पाडले

Jalna violence : जाळपोळ आणि हिंसाचार करणाऱ्या लोकांशी मराठा आंदोलनाचा काहीही संबंध नाही.
Manoj Jarange Criticized Fadanvis :
Manoj Jarange Criticized Fadanvis : Sarkarnama

Jalna Political News : पोलीस गोळ्या घालत होते, म्हणूनच मराठा आंदोलकांनी मला वेढा घातला होता. पण राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सपशेल खोटं बोलत आहेत. गृहमंत्रीपदावर बसलेल्या व्यक्तीला खोटं बोलणं शोभत नाही, अशा शब्दात अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे यांनी निशाणा साधला आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत.दोन दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचाराबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, आम्हाला माणूस मरु देता येत नाही. मराठा आंदोलकांनी मनोज जरांगे यांना वेढा टाकल्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला. पण, मनोज जरांगे यांनी मात्र फडणवीसांचा हा दावा फेटाळून लावला.

Manoj Jarange Criticized Fadanvis :
Nagar ST service Stoped : जालन्यातील संघर्षामुळे नगरमध्ये एस.टी. सेवा ठप्प ; प्रवासी, विद्यार्थ्यांची गैरसोय

मनोज जरांगे म्हणाले, तुमचे पोलीस गोळीबार करत होते म्हणून मराठा आंदोलकांनी मला वेढा टाकला होता. माझ्यावर उपचार करायचे होते, असं फडणवीस म्हणाले, पण मागच्या दोन दिवसांपासून इथे डॉक्टर तरी येत होते का, हे कोणालाही विचारा. राज्याच्या गृहमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला असलं खोटं बोलणं शोभत नाही. मी तुमचं वक्तव्य ऐकलं नसतं तर बोलण्याची तसदीही घेतली नसती, अशा शब्दांत जरांगेंनी फडणवीसांना सुनावले आहे.

मनोज म्हणाले, जाळपोळ आणि हिंसाचार करणाऱ्या लोकांशी मराठा आंदोलनाचा काहीही संबंध नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो. या हिंसाचारात आमच्या कोणत्याही आंदोलकाचा हात नाही. आम्हाला कोणत्याही प्रकारचा उद्रेक, हिंसाचार करायचा नाही. शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने आम्हाला पाठबळ द्या.आम्ही या सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली आहे. आतापर्यंत इतके मोर्चे निघाले. शांततेच्या मार्गाने मोर्चे निघाले, आंदोलने झाली. आमचं आंदोलन बदनाम करण्यासाठी गाड्या का जाळल्या जात आहेत. लोक का हिंसाचार माजवत आहेत, याचा मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी याचा शोध घेऊन आरोपींवर गुन्हे दाखल करावेत, असे मागणीही मनोज जरांगेंनी केली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in