Ambadas Danve On Court Decision : सोळा आमदारांच्या अपात्रतेवर अध्यक्ष नियमाने, कायद्याने निर्णय घेतील अशी अपेक्षा..

Shivsena : आम्हाला विश्वास आहे, ते नियमानूसार, कायद्याची बूज राखणारा निर्णय लवकरात लवकर घेतील.
Ambadas Danve On Court Decision, News
Ambadas Danve On Court Decision, NewsSarkarnama

Shivsena : राज्यातील शिंदे सरकार हे राज्यपालांनी त्यांच्या अधिकाराचा केलेला गैरवापर, केंद्राचा दबाव, आणि भाजपच्या मदतीने आले होते हे आता स्पष्ट झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने देखील यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राहिला प्रश्न विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय देण्याचा, तर ते नियमाने आणि कायद्याने तो देतील असा आम्हाला विश्वास असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी व्यक्त केला आहे.

Ambadas Danve On Court Decision, News
Sandipan Bhumre On Court Decision News : आमची बाजू कायदेशीर, अध्यक्षांचा निकालही आमच्या बाजूनेच लागेल..

राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) निकाल आल्यानंतर दानवे यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आमच्या विरोधात गेला तर त्याला देखील आम्ही कोर्टात आव्हान देवू शकतो, असेही दानवे यांनी स्पष्ट केले. (Shivsena) दानवे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला याबद्दल आम्हाला, स्वतः उद्धव ठाकरे यांना देखील पश्चाताप नाही.

त्यावेळची परिस्थिती, पक्षातील आमदारांनी केलेली गद्दारी पाहता त्यांनी घेतला तेव्हाचा निर्णय योग्यच होता. उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेची बूज राखत राजीनामा दिला होता. (Maharashtra) तशी नैतिकता आताचे शिंदे-फडणवीस सरकार दाखवणार का? हा खरा प्रश्न आहे. विधानसभा अध्यक्ष आता त्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर काय निर्णय देतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. परंतु विधानसभेचे अध्यक्ष हे कोणत्या पक्षाचे नसतात, ते सगळ्यांचे असतात. त्यामुळे आताच त्यांच्या हेतूविषयी शंका उपस्थितीत करणे योग्य ठरणार नाही.

आम्हाला विश्वास आहे, ते नियमानूसार, कायद्याची बूज राखणारा निर्णय लवकरात लवकर घेतील. ते काय निर्णय घेतात, त्यानंतर पुढची दिशा ठरवली जाईल. हा निर्णय आमच्या विरोधात गेला तर त्याला देखील आव्हान देता येते. एकंदरित सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला निकाल हा राज्यासाठीच नाही तर देशासाठी दिशादर्शक ठरणारा आहे. न्यायालयाने कायद्याची बूज हा निकाल देतांना राखली आहे, असेही दानवे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com