Pankaja Munde| पंकजा मुंडे अजूनही नाराज आहेत का?

Pankaja Munde news| विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी त्यांना संधी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र तेव्हाही त्यांना डावलण्यात आलं.
Pankaja Munde News
Pankaja Munde News Sarkarnama

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. त्यांची ही नाराजी अनेकदा दिसूनही आली. त्यांच्या समर्थकांकडूनही अनेकदा त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची मागणी केली जाते. त्यातच राज्यातील नव्या शिंदे सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद दिलं जावं अशीही मागणी करण्यात येत आहे.

मात्र मंत्रिमंडळाचा विस्ताराबाबत शिंदे फडणवीस गोटातही थोडीशी अंतर्गत धुसफूस असल्याचे दिसते. त्यातच आता पुन्हा एकदा पंकजा मुंडेंची नाराजी दिसून आली आहे. पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने परळीत ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र या बॅनर वरून भाजपच्या एकाही बड्या नेत्यांचे फोटोच गायब आहेत. त्यातल्या काही बॅनरवर तर केवळ गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याच फोटो होता. पंकजा मुंडे यांना सतत डावललं गेल्याची सल पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मनात आहे आणि तीच नाराजी आता वाढदिवसाच्या बॅनरवर हे दिसून येत आहे. त्यामुळे परळीत या बॅनरची सध्या जास्त चर्चा आहे.

Pankaja Munde News
शिंदे अन् खोतकरांच्या भेटीचा व्हिडीओ व्हायरल; दानवे म्हणतात भेट गुप्त...

सर्वसाधारणपणे पक्षांच्या बॅनरवर वरिष्ठ नेत्यांचाही फोटो असतो. त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचे फोटो दिसतात. मात्र पंकजा मुंडे यांच्या बॅनरवर मराठवाड्यातील आणि भाजपमधील एकाही वरिष्ठ नेत्याचा फोटो वा नाव नसल्याने सध्या हा चर्चेचा विषय ठरला आहे. यावर पंकजा मुंडे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

मागील विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा परळीतून पराभव झाला. त्यानंतर त्यांना पक्षाकडूनही फार मोठी जबाबदारी देण्यात आली नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी त्यांना संधी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र तेव्हाही त्यांना डावलण्यात आलं. राज्यातील शिंदे सरकारमध्ये त्यांचे नाव उपमुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होतं. पण त्यावेळीही त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं नाही. त्यामुळे पंकजा मुंडेकडे दुर्लक्ष केलं जात असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमधून दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com