IPL:अंडर १९ मधील कामगिरीने उस्मानाबादच्या राजवर्धन हंगरगेकरची धोनीच्या संघात एन्ट्री

वडिलांचे कोरोनाने दोन वर्षापुर्वी निधन झाल्यानंतर त्यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी राजवर्धन त्याच तडफेने खेळत राहिला. (Osmanabad District)
Rajwardhan Hangrgekar,Osmanabad
Rajwardhan Hangrgekar,OsmanabadSarkarnama

उस्मानाबाद : तुळजापूर येथील राजवर्धन हंगरगेकर या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपट्टुची आयपीएल संघात निवड झाली आहे. (Osmanabad) विशेष म्हणजे त्याच्यासाठी चेन्नईच्या संघमालकाने दिड कोटी रुपये मोजले आहेत. (Marathwada) जिल्ह्यासाठी नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. (Maharashtra) १९ वर्षाखालील वर्ल्डकल्पमध्ये त्याने केलेली चमकदार खेळी त्याला आयपीएलपर्यंत घेऊन गेली आहे.

दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अंडर-19 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाकडून खेळणाऱ्या राजवर्धन हंगरगेकरच्या कामगिरीची सध्या जोरदार चर्चा आहे. भारतीय संघातील सहा खेळाडू ऐनवेळी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते तरीदेखील भारताने मोठे विजय मिळवले. या विजयात मूळचा उस्मानाबादचा असलेल्या राजवर्धन हंगरगेकरचा मोलाचा वाटा होता.

अंडर-19 वर्ल्डकपमधील राजवर्धन हंगरगेकरच्या कामगिरीनं क्रिकेट विश्वात राजवर्धन लंबी रेस का घोडा ठरणार असल्याचे बोलल जात आहे. केवळ गोलंदाजीच नव्हे तर, फलंदाजीतही त्यान आपली चमक दाखवुन दिली आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला राजवर्धन आता संघमालकाच्याही नजरेत भरल्याचे दिसुन येत आहे. आजवर केलेल्या कष्टाच चिज होत असल्याच्या भावना जिल्हाभरातुन व्यक्त होत आहेत.

Rajwardhan Hangrgekar,Osmanabad
राजकारणी `पुष्पा`च्या प्रेमात; आमदार संदीप क्षीरसागरही म्हणाले, मै झुकेंगा नही...

वडिलांचे कोरोनाने दोन वर्षापुर्वी निधन झाल्यानंतर त्यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी राजवर्धन त्याच तडफेने खेळत राहिला. त्याच्या वडीलांची स्वप्नपुर्ती करणारा राजवर्धन यशासमीप गेल्याचे दिसुन येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com