उपमुख्यमंत्री फडणवीस नाराजच : असं का म्हणाले जयंत पाटील!

Jayant Patil : शिवसैनिक निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाला जागा दाखवतील, असाही टोला त्यांनी लगावला.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama

परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे परभणी दौऱ्यावर होते, दरम्यान त्यांनी शिंदे फडवणीस सरकारवर यावेळी जोरदार हल्ला चढवला. भाजपमध्ये सुद्धा शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून प्रचंड असंतोष आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे सुद्धा नाराज आहेत. फडवणीस हे मुख्यमंत्री होणार होते मात्र ते झाले नाही तर महाराष्ट्रातील हा सत्ता बदल कोणालाच रुचलेला नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली

शिंदे फडणवीस सरकारचं भवितव्य अद्यापही सुप्रीम कोर्टात आहे, सुप्रीम कोर्ट तारीख वर तारीख देत असल्याने यावर जयंत पाटील यांनी नाराजी दर्शवली, सुप्रीम कोर्टाने सलग बसून याचा तातडीने निर्णय दिला पाहिजे, विलंबाने निर्णय देणे हे चुकीचे आहे. सुप्रीम कोर्ट का निकाल देत नाही याचा आश्चर्य वाटतंय. सतत बसून तातडीने निर्णय दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली

Jayant Patil
माजी राज्यमंत्री देशमुखांनी घेतली खासदार सावंतांची भेट, लवकरच शिवसेनेत एन्ट्री ?

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून भाजप सोबत सत्ता स्थापन केली तर अनेक शिवसैनिक हे शिंदे गटात जात असल्याने यावर जयंत पाटील यांनी शिवसेनेची बाजू धरली. कार्यकर्ते हे प्रवेश करत नाही तर पुढारी हे शिंदे गटात जात आहेत. त्यांना प्रलोभन दाखवले जात आहेत. तसेच परभणीतील शिवसैनिक ढासळला नाही तर शिवसैनिक जागेवरच आहेत. परभणीतील शिवसैनिक स्थिर आहेत. शिवसैनिक आगामी निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाला जागा दाखवतील, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com