ओवेसींना औरंगजेब कबरीवर माथा टेकवणे महागात पडणार ; गृहमंत्र्यांकडून कारवाईचे संकेत..

संभाजी महाराजांना हालहाल करून ठार मारले, त्या क्रूर राज्याच्या कबरीवर डोकं टेकवून एमआयएमने आपली रझाकारी वृत्ती दाखवून दिल्याची टीका शिवसेनेने केली होती. (Home Minister Dilip Walse Patil)
Dilp Walse Patil- Akbaruddin Owasi
Dilp Walse Patil- Akbaruddin OwasiSarkarnama

नांदेड : आ रहा हूं औरंगाबाद, म्हणत शहरात दाखल झालेले, औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात एका नव्या वादाला तोंड फोडणारे एमआयएमचे (Aimim) नेते आमदार अकबरुद्दीन ओवेसी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. खुल्ताबादला जाऊन औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्या प्रकरणी आता अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनीच तसे संकेत नांदेड येथे पत्रकारांशी बोलतांना दिले आहेत.

औरंगाबादच्या पोलिस आयुक्तांना या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. (Nanded) दिलीप वळसे पाटील हे नांदेड दौऱ्यावर असतांना प्रसार माध्यमांनी त्यांना औरंगाबादेतील अकबरुद्दी ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्याबद्दल प्रश्न विचारला. (Marathwada) यावर ही कृती कुणालाही आवडणारी नाही, असे स्पष्ट करत या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

दिलीप वळसे पाटील म्हणाले, औरंगजेबालाच्या कबरीला भेट देणं कुणालाही आवडणार नाही. या प्रकरणाची चौकशी औरंगाबादचे पोलिस आयुक्त करत आहेत. नक्कीच या प्रकरणात कारवाई केली जाईल. ओवेसी स्कूल आॅफ एक्सलन्सीच्या महाराष्ट्रातील पहिल्या शाखेची पायाभरणी करण्यासाठी एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी १२ मे रोजी औरंगाबादेत आले होते.

या दौऱ्यात त्यांनी शहरातील पाणचक्की येथील दर्गा, खुल्ताबाद येथील दर्गा व औरंगजेब कबरीला भेट देऊन दर्शन घेतले होते. त्यानंतर शिवेसना, राष्ट्रवादीसह अन्य पक्षांनी एमआयएमवर टीकेची झोड उठवली होती. ज्या औरंगजेबाने हिंदूंची मंदिर पाडली, छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून ठार मारले, त्या क्रूर राज्याच्या कबरीवर डोकं टेकवून एमआयएमने आपली रझाकारी वृत्ती दाखवून दिल्याची टीका शिवसेनेने केली होती.

Dilp Walse Patil- Akbaruddin Owasi
Sharad Pawar : महागाईने आठ वर्षातील उच्चांक गाठलाय, त्याकडे लक्ष द्या..

त्यानंतर राज्यातील विविध पक्ष आणि संघटनांकडून अकबरुद्दीने ओवेसी यांच्या या कृतीचा निषेध केला होता. एमआयएमने या प्रकाराला घाणेरडे राजकारण म्हणत औरंगजेब कबरीच्या दर्शनाचे समर्थन केले होते. परंतु हे प्रकरण एमआयएम आणि अकबरुद्दीन ओवेसी यांना चांगलीच महागात पडण्याची शक्यता आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तसे स्पष्ट संकेतच दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com