Chandrakant Khaire On Sattar News : वाढत्या शेतकरी आत्महत्या, पीकांचे नुकसान हाच कृषीमंत्र्यांचा पायगुण ?

Abdul Sattar : सत्तार यांच्या मतदारसंघात एकाचवेळी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. सध्या देखील राज्यात आत्महत्या वाढल्या आहेत.
Chandrakant Khaire-Abdul Sattar News
Chandrakant Khaire-Abdul Sattar NewsSarkarnama

Shivsena : मी कृषीमंत्री झालो तेव्हा पासून राज्यात अवकाळी का असेना पण पाऊस पडतोय, सर्वत्र पाणी आहे, असा दावा अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केला होता. यावर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पलटवार करत राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्या, त्यांच्या मालाचे, पिकांचे नुकसान हाच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा पायगुण आहे, अशी टीका केली.

Chandrakant Khaire-Abdul Sattar News
Chandrakant khaire Allegation On Bjp : कर्नाटकातील पराभवानंतर भाजपचा राज्यात दंगली घडवण्याचा प्लॅन..

सत्तार यांनी कृषीमंत्री झाल्यावर फक्त या खात्यातून आपल्याला किती ओरबाडता येईल, एवढेच पाहिले, असा आरोपही खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर काही दिवसांपुर्वी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी टीका केली होती. १६आमदाराच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्टात निकाल लागणार होता, तेव्हा खैरे यांनी यज्ञ, पुजापाठ केला होता. यावरून सत्तारांनी केलेल्या टीकेला खैरेंनी आज प्रत्युत्तर दिले.

खैरे म्हणाले, सत्तार कृषीमंत्री झाले तेव्हा त्यांनी सर्वात आधी आमच्या इथे कलेक्टर असलेल्या माणसाला कृषी आयुक्त केलं. (Shivsena) या खात्यातून आपल्याला किती ओरबडता येईल याची माहिती घेतली आणि आता सध्या तेच काम सुरू आहे. माझ्या पायगुणाने सगळीकडे पाणी आहे म्हणणाऱ्या सत्तार यांच्यात मतदारसंघात एकाचवेळी तीन शेतकऱ्यांनी आतम्हत्या केल्या होत्या. सध्या देखील राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

अवकळी, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतीमाल खराब झाला, आहे त्या मालाला भाव नाही, जनावरे दगावली. शेतकरी चोहोबाजूंनी संकटात सापडल्याने हवालदिल झाला आहे. हा खरा सत्तारांचा पायगुण आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यात, मदत करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे हा देखील कृषीमंत्र्यांचाच पायगुण असल्याचा टोला देखील खैरे यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com