
Congress : लातूर येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Latur APMC Chairman Election News) सभापती पदी जगदीश बावणे यांची तर उपसभापती पदी सुनील पडीले यांची निवड झाली. सभापती, उपसभापतींसह सर्व संचालकांनी आशियाना निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब, माजी पालकमंत्री आमदार अमित देशमुख, आमदार धिरज देशमुख यांनी अभिनंदन करून सत्कार केला.
सर्व संचालकांनी चांगले काम करून बाजार समितीचा लौकिक आणखी वाढवावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. (Congress) नुकत्याच झालेल्या बाजार समिती निवडणुकीत जिल्ह्यातील दहा पैकी पाच बाजार समित्यांवर महाविकास आघाडीने तर पाच ठिकाणी भाजपने यश मिळले.
लातूर बाजार समिती राज्यातील अग्रेसर समजली जाते. (Latur) या निवडणुकीत काँग्रेसच्या कृषी विकास पॅनलचे सर्व १८ जागा मोठ्या मताधिक्याने जिंकल्या होत्या. तर विरोधी भाजपच्या पॅनलचे सर्व १८ उमेदवार पराभूत झाले होते. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी लातूरचे देशमुख बंधू आणि भाजपच्या संभाजी पाटील निलंगकेर (Sambhajipatil Nilangekar) यांच्यासह जिल्ह्यातील नेत्यांनी शक्तीपणाला लावली होती.
परंतु लातूरमध्ये एकहाती सत्ता मिळवत देशमुख बंधुंनी आपले वर्चस्व कायम राखले. सभापती, उसभापती पदाच्या निवडणुकीत बावणे आणि पडीले यांची देखील बिनविरोध निवड झाली. सर्व संचालक मंडळ आणि सभापती, उपसभापतींनी शेतकरी हिताचे निर्णय घेवून बाजार समितीचा लौकिक आणखी वाढवावा, अशी अपेक्षा सत्कार प्रसंगी दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.