Parbhani : शांतता समितीच्या बैठकीतच आमदार गुट्टेंनी केले पोलिसांवर हप्तेखोरीचे आरोप...

जाहीरपणे आरोप करून तुम्ही विषयांतर करत आहात. तुमच्याकडे हप्ते घेतल्याचे पुरावे असतील तर ते आम्हाला द्या, आम्ही निश्चित कारवाई करू. ( Mla Ratnakar Gutte)
Mla Ratnakar Gutte News, Gangakhed
Mla Ratnakar Gutte News, GangakhedSarkarnama

परभणी : गंगाखेडचे रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी पोलिसांनी बोलावलेल्या शांतता समितीच्या बैठकीत थेट पोलिसांवरच हप्ते घेत असल्याचा आरोप केला. (Parbhani) जाहीर कार्यक्रमातून कुठल्याही पुराव्याशिवाय आरोप करणाऱ्या आमदारांविरोधात मग व्यासपीठ व समोर बसलेले पोलिस अधिकारी व कर्मचारी देखील चांगलेच संतापले. आधी पुराव्या द्या, मग आरोप करा असा आक्रमक पावित्रा पोलिस अधिकाऱ्यांनी घेतल्यामुळे शांतता समितीची बैठक चांगलीच वादळी ठरली.

आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) हे काही दिवसांपुर्वी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले होते. एका पक्षप्रेवश सोहळ्यात निवडणुकीत दोघांकडून पैसे घ्या आणि तिसऱ्याच उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन गुट्टे यांनी जाहीररित्या केले होते. (Marathwada) त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या शांतता समितीच्या बैठकीतच गुट्टे यांनी पोलिसांवर हप्तेखोरीचा आरोप करत खळबळ उडवून दिली.

गुट्टे असा काही आरोप करतील अशी अपेक्षा नसलेल्या अधिकाऱ्यांना या विधानाने चांगलाच धक्का बसला. घरी बोलावलेल्या पाहुण्याने आपलीच अब्रू वेशीला टांगावी असा प्रकार घडल्याने बैठकीतील वातावरण चांगलेच तापले होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहर, तालुका व गावपातळीवर शांतता समितीच्या बैठका घेतल्या जात आहे.

गंगाखेड पोलिस ठाण्याच्या वतीने देखील अशाच बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार गुट्टे यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी भाषण करतांना गुट्टे यांची गाडी विषय सोडून भरकटली. तुमचे पोलिस हप्ते घेतात, आधी त्यांना रोखा, असे म्हणत गुट्टे यांनी वादाला सुरूवात केली. यावर आक्षेप घेणाऱ्या व्यासपीठावरील एका पोलिस अधिकाऱ्याला तु मध्ये बोलू नको, असे म्हणत गुट्टेंनी आपले म्हणणे पुढे रेटले.

Mla Ratnakar Gutte News, Gangakhed
Hingoli : काॅंग्रेसच्या पठडीत तयार झालेले टारफे बांगरांना टक्कर देऊ शकतील का?

जाहीरपणे आरोप होत असल्याने पोलिस अधिकारी व समोर बसलेल्या कर्मचारी, नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रनिक लोढा आणि इतर पोलीस कर्मचारी हजर होते. गुट्टे यांचा आरोप उपस्थितांच्या जिव्हारी लागला आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली.

जाहीरपणे आरोप करून तुम्ही विषयांतर करत आहात. तुमच्याकडे हप्ते घेतल्याचे पुरावे असतील तर ते आम्हाला द्या, आम्ही निश्चित कारवाई करू. पण सरसकट सगळ्यांवर हप्तेखोरीचा आरोप करू नका, असा शब्दात गुट्टे यांना सुनावले. तुम्ही आम्हाला सन्मान दिला, तर आम्ही देखील तुमचा सन्मान करू, असे म्हणत गुट्टे यांनी भाषण आवरते घेतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in