पूर्वी बीडचा विकास कागदोपत्रीच व्हायचा; प्रत्यक्षात निधी खर्चच होत नव्हता..

निवडणुकीत तुम्ही आशिर्वाद दिले, त्यावेळी दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करतो आहे. तुमचे आशिर्वाद विकास कामे करण्यासाठी मला प्रेरणा देतात. (Mla Sandeep Kshirsagar)
Mla Sandeep Kshirsagr-Bhartbhushan Kshirsagar
Mla Sandeep Kshirsagr-Bhartbhushan Kshirsagarsarkarnama

बीड : मागील अनेक वर्षांपासून बीड शहराचा विकास हा फक्त कागदोपत्री व्हायचा. शासनाकडून आलेला निधी प्रत्यक्षात खर्च व्हायचाच नाही, (Beed) असा आरोप आमदार संदीप क्षीरसागर (Mla Sandip Kshirsagar) यांनी केला. त्यांनी नाव न घेता काका नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर टिकास्त्र सोडले. (Ncp)

निवडणुकीत तुम्ही आशिर्वाद दिले, त्यावेळी दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करतो आहे. तुमचे आशिर्वाद विकास कामे करण्यासाठी मला प्रेरणा देतात असेही ते म्हणाले. सोमवारी शहरातील विविध भागांतील सिमेंट रस्ते व काँक्रीट नाली बांधकामांचे भूमिपुजन क्षीरसागर यांच्या हस्ते झाले.

आगामी नगर पालिका निवडणुकीच्या दृष्टीने क्षीरसागर काका - पुतण्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यामुळे शहरात सध्या भूमिपुजन व लोकार्पण कार्यक्रमांचा धडाका सुरू आहे. संदीप क्षीरसागर यांनीही निवडणुकीच्या तोंडावर शहरातील कामांसाठी दोन कोटी १० लाख रुपयांचा निधी आणला. या कामांचे भूमिपुजन करताना त्यांनी काकांवर शरसंधाण साधले.

Mla Sandeep Kshirsagr-Bhartbhushan Kshirsagar
देशमुखांना टक्कर देण्यासाठी कराड जिल्ह्यात दोन साखर कारखाने उभारणार

या निधीतून प्रभाग दोन, प्रभाग सहा, सात मधील सिमेंट काँक्रीट रस्ता, नाली बांधकाम व इतर कामे होणार आहेत. या निमित्ताने संदीप क्षीरसागर यांनी विरोधकांच्या काळात कागदोपत्री होणारी कामे आणि आपण प्रत्यक्षात करत असलेली कामे याचा दाखला देत यापुढेही आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com