बापाला मारायचं अन् पोरालां मोठं करायंच, ही औरंगजेब निती भाजप पंकजाच्या बाबतीत वापरतयं ..

समाज ज्यांच्या पाठीशी आहे त्यांना डावलायचे आणि ज्यांना काही स्थान नाही त्यांना पुढे करायचे, असा सगळा प्रकार सुरू असल्याचेही ते म्हणाले. (Prakash Mahajan)
बापाला मारायचं अन् पोरालां मोठं करायंच, ही औरंगजेब निती भाजप पंकजाच्या बाबतीत वापरतयं ..
Mns Leader Prakash Mahajan-Bjp Leader Pankaja MundeSarkarnama

औरंगाबाद : ऐनकेनप्रकारे पंकजा मुंडेला बदनाम करायचे, विधान परिषदेची उमेदवारी मागितलेली नसतांना ती मागितली म्हणून बोंब ठोकायची, मग पुन्हा नाकारली म्हणून मिडियात बातम्या पसरवायच्या, असा प्रकार सध्या राज्यातील भाजपकडून सुरू आहे, असा आरोप भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे मामा व मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केला आहे.

एका वृतवाहिनीशी बोलतांना त्यांनी पंकजा मुंडे यांचा मामा म्हणून आपली भूमिका मांडली. पंकजा मुंडे यांच्या बाबतीत भाजप (Bjp) औरंगजेबाची निती वापरत आहे, म्हणजे बापाला मारायचं आणि पोराला मोठं करायचं, असा टोला देखील महाजन यांनी डाॅ. भागवत कराड यांना पुढे करून पकंजांना शह देण्याच्या प्रयत्न करणाऱ्या भाजप नेतृत्वाला लगावला. (Marathwada) समाज ज्यांच्या पाठीशी आहे त्यांना डावलायचे आणि ज्यांना काही स्थान नाही त्यांना पुढे करायचे, असा सगळा प्रकार सुरू असल्याचेही ते म्हणाले.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पंकजा मुंडे समर्थकांकडून भाजप नेत्यांच्या वाहनाचा ताफा अडवणे, भाजप कार्यालयासह केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या कार्यालयावर हल्ला असे प्रकार घडले. यातून पंकजा मुंडे यांना विधान परिषदेत डावलण्यात आल्यामुळे हा उद्रेक सुरू असल्याचे चित्र आहे. परंतु ही वस्तुस्थिती नसून हा पकंजा मुंडे यांना बदनाम करण्याचा हेतूपुरस्पर सुरु असलेला प्रयत्न असल्याचा आरोप देखील महाजन यांनी केला.

प्रकाश महाजन म्हणाले, पंकजा मुंडे यांनी पक्षाकडे कधीही विधान परिषदेची उमेदवारी मागितली नव्हती. जी पंकजा परळी मतदारसंघात ९० हजारांच्यावर मतं मिळवते, लाखोंचे मेळावे घेते, ती दोन-चार कार्यकर्त्यांना पाठवून भाजपच्याच कार्यालयावर किंवा केंद्रीय राज्य मंत्र्यांच्या कार्यालयावर हल्ला करायला लावेल हे शक्य आहे का ? पुन्हा यावर पकंजा मुंडे गप्प आहे, असे म्हणत तिची कोंडी करायची असा प्रकार मुद्दामहून केला जातोय.

Mns Leader Prakash Mahajan-Bjp Leader Pankaja Munde
शाळा प्रवेशसाठी सुरू होती लूट ; आमदार, शिक्षणाधिकाऱ्यांनी केले स्टींग ऑपरेशन

बोललं तर पक्षाची शिस्त मोडल्याचा ठपका ठेवायला पुन्हा हे मोकळे. त्यामुळे पंकजा मुंडे या वादावर बोलणार नाही, पण या प्रकारामुळे तिची घुसमट आणि कुटुंबाला त्रास होत आहे हे मी तिचा मामा म्हणून निश्चित सांगू शकतो. विधानसभा निवडणुकीला अडीच वर्ष राहिलेले असतांना पंकजा विधान परिषदेची उमेदवारी कशी मागू शकते ? पण अशा वावड्या उठवायच्या आणि तिला बदनाम करायचे हा प्रकार सध्या सुरू आहे.

पंकजा भाजप कधीच सोडणार नाही..

हे कोण करतयं हे देखील सगळ्यांना माहित आहे, पण कुणी बोलणार नाही. गोपीनाथ मुंडेंची कन्या असल्यामुळे पंकजा कधी या विषयावर बोलणार नाही, राहिला प्रश्न पक्ष सोडण्याचा तर असा विचार देखील तिच्या मनात कधी येणार नाही. कारण या पक्षातच तिचा जन्म झाला आहे. गोपीनाथ मुंडे यांनी हा पक्ष वाढवलेला आहे, म्हणजेच भाजप हा तिचा पक्ष आहे. त्यामुळे पक्ष सोडण्याचं तिच्या किंवा तिच्या समर्थकांच्या मनात देखील असणे शक्य नाही.

सत्ता नसली की समर्थक सैरभैर होतात, त्यातून अशी चर्चा पुढे येत असते, पण त्यात काही तथ्य नसल्याचेही प्रकाश महाजन यांनी स्पष्ट केले. राजकारण म्हटलं की असे प्रकार घडत असतात, अशावेळी संयमाने काम करत राहायचे असते आणि पंकजा ते करते आहे. ही वेळ निघून जाईल आणि पुन्हा चांगले दिवस येतील, असा मला विश्वास असल्याचेही महाजन म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in