Parbhani Politics : अखेर ती शंका खरी ठरली: परभणीत शिंदे गटाचा पुन्हा विरोधांना झटका

आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने आतापासूनच आपली तयारी सुरु केल्याचे दिसत आहे.
Parbhani Politics
Parbhani Politics

Parbhani Politics : राज्यातील सत्तांतरानंतर गेल्या सहा महिन्यांपासून फोडाफडीचे राजकारण पाहायला मिळत आहे. मुंबई, नाशिकसह राज्यभरात अनेक ठिकाणी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक बड्या नेत्यांसह स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यां शिंदे गटात प्रवेश केला. गेल्या सहा महिन्यांपासून हे फोडाफोडीच राजकारण सुरुच आहे. असे असतानाच आता परभणीतूनही अशीच बातमी समोर आली आहे.

आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने आतापासूनच आपली तयारी सुरु केल्याचे दिसत आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील सुमारे 40 सरपंच, उपसरपंच, सभापती, पंचायत समिती सभापती, ग्रामपंचायत सदस्य, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. हा विरोधकांसाठी मोठा झटका मानला जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून परभणीच्या राजकीय वर्तुळात .या मेेगा भरतीबद्दल दबक्या आवाजात चर्चा होती अखेर आज ती खरी ठरली, असेही बोलले जात आहे.

Parbhani Politics
Nagpur BJP : नितीन गडकरी खासदार क्रिडा महोत्सवात राडा; भाजप नेत्याच्या मुलाची पंच, आयोजकांना मारहाण

याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या महिन्यात राज्यभरात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिंदे गटाचे 1593 सरपंच निवडून आले. आज त्यात अजून 40 जणांची भर पडली. तुम्ही पक्षावर दाखवलेला हा विश्वास आम्ही सार्थ ठरवू आणि तालुक्याच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करु.

चाळीस सरपंचांनी केलेल्या पक्षप्रवेशावेळी त्याठिकाणी शिंदे गटाचे पक्षाचे सचिव संजय म्हशीलकर, परभणीचे शिंदे गटाचे नेते सईद खान, खासदार भावना गवळी, आमदार संजय शिरसाट, आमदार बालाजी कल्याणकर, शिंदे गटाचे सचिव सुशांत शेलार, प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि इतर अनेक सहकारीही उपस्थित होते.

या लोकांनी केला शिंदे गटात प्रवेश

एकनाथ शिंदे यांनीच फेसबुक पोस्ट मधून याबाबत माहिती दिली आहे. यात ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष सरपंचांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुंजाभाऊ टाकळकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रमोद पाटील यांचाही समावेश आहे.

तसेच माजी नगराध्यक्ष मोईन अन्सारी, माजी उपनगराध्यक्ष युसूफ अन्सारी, नगरसेवक नामदेव चिंचाणे, शंकर चिंचाणे, परभणीचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, मावळा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकाश नवघरे, परभणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ साखरे पाटील, ठाकरे गटाचे मानवत पंचायत समिती सभापती शिवाजी उक्कलकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in