लव्ह, सेक्स आणि धोका; पोलिसानेच केला पोलिस तरूणीवर अत्याचार...

औरंगाबादमधील (Aurangabad) एका भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेत महिला कर्मचारी प्रशिक्षण घेत असताना दोघात ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीत झाले होते.
लव्ह, सेक्स आणि धोका; पोलिसानेच केला पोलिस तरूणीवर अत्याचार...
Crime news, jalna PoliceSarkarnama

जालना : लव्ह सेक्स आणि धोक्याचे अनेक प्रकार आपण पाहिले असेल मात्र जालन्यात चक्क पोलिस कर्मचऱ्यानेच महिला पोलिस कर्मचारी असलेल्या तरुणी सोबत तब्बल तीन वर्षे बलात्कार (sexual assualt) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Crime) इतकेच नव्हे तर या पोलीस कर्मचाऱ्याने महिला कर्मचारी असलेल्या प्रियशीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्या सोबत अत्याचार करत दुसऱ्या तरुणी सोबत घरोबा केल्याचाही प्रकार समोर आला. कायद्याचे रक्षक असणाऱ्या खाकीतील जवानामध्येच लव्ह सेक्स आणि धोक्याचा प्रकार उघडकीस आल्याने जालन्यात एकाच खळबळ उडाली आहे. (Jalna Police)

Crime news, jalna Police
प्रवीण दरेकरांना सोमवारपर्यंत अटक करु नका!

जालना जिल्हा कारागृहात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारी असलेल्या महिलेला पुणे राज्य राखीव पोलिस दलात कार्यरत असलेल्या पंकज मगर या आरोपी पोलीस जवानाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मूळचा वर्धा जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या पंकज आणि पीडित महिला पोलिस कर्मचारी हे दोघेही वेगवेगळ्या जिल्ह्यातील रहिवाशी आहे. औरंगाबादमधील एका भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेत महिला कर्मचारी प्रशिक्षण घेत असताना दोघात ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं.

भर्तीपूर्व प्रशिक्षण केंद्रात झालेल्या मैत्रीतून दोघांच्या भेटी हळूहळू वाढू लागल्याने दोघांच्या मैत्रीचं रूपांतर अखेर प्रेमात झालं. प्रशिक्षण सुरू असताना पीडित महिला ही जालना जिल्हा कारागृहात पोलिस कर्मचारी म्हणून रुजू झाली. त्यानंतर आरोपी पंकजही पुणे येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या बल गट क्रमांक दोन मध्ये रुजू झाला. त्यानंतर आरोपी पंकजने लग्नाचे आमिष दाखवत पीडित महिला पोलिस कर्मचारी असलेल्या तरुणी सोबत तिच्या शासकीय निवास्थानात जाऊन तिच्यावर 2018 ते 2022 पर्यंत अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवत लेंकिंग अत्याचार केले.

Crime news, jalna Police
पुन्हा राजकारण तापणार; देशमुखांवरील वसुलीच्या आरोपांचा आजच होणार सोक्षमोक्ष

दरम्यान, पीडित महिला पोलिस कर्मचारी असलेल्या तरुणींनी लग्नाचा तगादा लावला असता पंकज हा वारंवार टाळाटाळ करत होता. पंकज यांच्यावर संशय आल्याने पीडित पोलिस कर्मचारी असलेल्या तरुणींनी त्यांची चौकशी केली असता. पंकज याने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवत डिसेंबर 2021 मध्येच एका दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर या महिला पोलिस कर्मचारी असलेल्या तरुणींनी पोलिसात धाव घेत पंकज विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पिडीतीच्या तक्रारीवरून तालुका पोलिसानी पोलिस ठाण्यात पंकज मगर यांच्या विरुद्ध अट्रोसिटी ऍक्ट व लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करून फसवणुक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक वडते हे करीत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in