APMC Election 2023: छत्रपती संभाजीनगर बाजार समिती निवडणूक: महाविकास आघाडी विरुद्ध भाजप लढत रंगणार

Chhatrapati Sambhajinagar Bazar Samiti Election: छत्रपती संभाजीनगरच्या बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होण्याची चिन्हे आहेत.
APMC Election 2023:
APMC Election 2023: Sarkarnama

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होण्याची चिन्हे आहेत. बाजार समिती निवडणुकीत (APMC Election) सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन पॅनल उभे करण्याची परंपरा आहे. मात्र, यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत व्हावी यासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे. (In Chhatrapati Sambhajinagar Bazar Samiti election, Maha Vikas Aghadi will fight against BJP)

२० एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी मुदत असल्यानं दोन्हीकडच्या नेत्यांचा तसा प्रयत्न सुरू आहे. सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव सेना स्वतंत्र लढतील असे म्हटले जात असले तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकजुटीचे प्रयत्न सुरू केले आहेत. म्हणून मविआविरुद्ध भाजप अशीच लढत होण्याची चिन्हे आहेत. अठरा जागांसाठी २०० उमेदवारांनी अर्ज भरले होते. (BJP-Mahavikas Aghadi Politics)

APMC Election 2023:
Karnatak Election 2023: भाजपला दुसरा धक्का; माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, काय आहे कारण?

जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, कन्नड, फुलंब्री,लासुर स्टेशन, वैजापूर, पैठण, गंगापूर या बाजारसमित्यांसाठी येत्या शुक्रवारी (२८ एप्रिल) आणि रविवारी (३० एप्रिल) रोजी मतदान होणार आहे. या बाजार समित्याच्या निवडणुकांसाठी पहिल्याच दिवशी २४९ अर्जांची विक्री झाली होती. यात सोसायटी, ग्रामपंचायत,व्यापारी हमाल मापाडी यासाठी अर्जांची विक्री करण्यात आली होती. तर गंगापूर बाजार समितीच्या १८ जागांसाठी पहिल्या दिवशी ६५ अर्जांची विक्री झाली होती. याशिवाय, छत्रपती संभाजी नगर बाजार समितीसाठी ४८ इच्छुक उमेदवारांनी, पैठण बाजार समितीतून १२ उमेदवारी अर्ज, तर लासुर स्टेशन बाजार समितीसाठी २३, कन्नड बाजार समितीसाठी ४९ आणि वैजापूर बाजार समितीसाठी ५२ अर्जांची विक्री करण्यात आली होती.

APMC Election 2023:
Pune News : पुणे बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पाच उमेदवारांची नावं जाहीर; काँग्रेसला पॅनेलमधून डच्चू

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.छत्रपती संभाजीनगर बाजार समितीसाठी जिल्हा उपनिबंधक मुकेश बारहाते, पैठण अनिल पुरी, लासुर स्टेशन किरण चौधरी, वैजापूर विनायक धोटे,गंगापूरसाठी डी. आर. मातेरे, फुलंब्री विष्णू रोडगे आणि कन्नड बाजार समितीसाठी अर्चना वाडेकर यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com