आधी मुंडेंनी अन् आता राष्ट्रवादीनं केलं काँग्रेसला घायाळ

मागील काही वर्षांत अनेक शिलेदारांनी पक्षाची साथ सोडली आहे.
आधी मुंडेंनी अन् आता राष्ट्रवादीनं केलं काँग्रेसला घायाळ
Congress File Photo

बीड : जिल्ह्यात काँग्रेसला (Congress) आता घरघर लागली आहे. मागील काही वर्षांत अनेक शिलेदारांनी पक्षाची साथ सोडली आहे. आघाडीतही पक्षाला फारशी संधी मिळाली नाही. त्यामुळं जिल्ह्याच्या मागील विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) काँग्रेस अस्तित्वच दिसलं नाही. आता अंबाजोगाईचे नगराध्यक्ष राजकिशोर मोदी (Rajkishor Modi) यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. सुरूवातीला दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) अन् आता राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) काँग्रेसला घायाळ केलं आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात सुरुवातीच्या काळात काँग्रेस नंबर वन पक्ष होता. काँग्रेसला डाव्या पक्षांकडून टक्कर दिली जात होती. पुढे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय उदय होताच काँग्रेसचा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजप पुढे आला. त्यावेळी काँग्रेसमधीलच काही नेत्यांनी भाजपची साथ दिली. परंतु त्यानंतरही जिल्ह्यातील दोन प्रमुख पक्षांत काँग्रेस एक होताच. भाजपकडून निवडणुकांत पराभव होत असला तरी लढणारा पक्ष म्हणून काँग्रेसचं अस्तित्व होतं.

Congress
काँग्रेसला धक्का; नगराध्यक्ष मोदी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काँग्रेसची घसरण सुरू झाली. अनेक दिग्गजांनी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला. पक्षांतर्गत गटबाजी सुरू झाली. त्यात १९९९ ते २०१४ या काळात तत्कालिन आघाडीचे सरकार असले तरी पालकमंत्री राष्ट्रवादीचा असे. त्यामुळे पक्षाला राष्ट्रवादीकडे पहावे लागे.

याकाळातील तीन निवडणुकांपैकी दोन निवडणुकांत सहापैकी एकमेव परळी मतदार संघ काँग्रेससाठी शिल्लक होता. त्यातही मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसच्या वाट्याची एकमेव जागा देखील तत्कालिन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासाठी स्वत:ला सोडवून घेतली.

Congress
भाजपला मोठा धक्का; रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज बाद

त्या बदल्यात जिल्ह्यातील दुसरी जागाही काँग्रेसला दिली नाही. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एकही जागा लढविली नाही, असा बीड एकमेव जिल्हा असावा. धनंजय मुंडे यांच्या विजयात मदत व परळीची जागा देण्याच्या बदल्यात राष्ट्रवादीने काँग्रेसचे संजय दौंड यांना धनंजय मुंडे यांच्या जागी विधान परिषदेवर घेतले खरे पण राष्ट्रवादीच्या कोट्यातून. त्यामुळे दौंड देखील अगोदरच राष्ट्रवादीमय झाले. आता पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे राजकीशोर मोदी देखील काँग्रेस सोडत असून तेही राष्ट्रवादीतच जाणार आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in