Imtiyaz Jaleel Strike: नामांतराविरोधात इम्तियाज जलील यांचं उपोषण मागे; हे आहे कारण

औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर या नामांतराच्या विरोधात एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचं साखळी उपोषण सुरु होतं.
Imtiyaz Jaleel Strike:
Imtiyaz Jaleel Strike:Facebook @Imtiyaz Jaleel

Imtiyaz Jaleel Strike: औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर या नामांतराच्या विरोधात एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचं साखळी उपोषण सुरु होतं. हे उपोषण अखेर त्यांनी मागे घेतलं आहे.तसेच उपोषण मागे घेत असल्याचं कारणही त्यानी स्पष्ट केलं आहे.

गेल्या 14 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचं उपोषण सुरु होतं. पण छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची भेट घेतल्यानंतर आपण उपोषण मागे घेत आहोत.अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली. तसेच काही संघटनांकडून शहरात वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू असल्यानेच आपण उपोषण मागे घेत असल्याचं जलील यांचं म्हणणं आहे.

Imtiyaz Jaleel Strike:
Third Front without Congress: आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी ; ममता बँनर्जी, अखिलेश यादव..

राज्य आणि केंद्र सरकारने या महिन्याच्या सुरुवातीलाच औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला.पण या निर्णयाला विरोध करत खासदार जलील यांनी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय समोर 4 मार्च पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं.

उपोषण मागे घेताना इम्तियाज जलील म्हणाले की, रविवारी (१९ मार्च) काही हिंदू संघटना शहरात मोर् काढणार आहेत. या मार्च्यात चिथावणीखोर भाषणे करणाऱ्या व्यक्ती बाहेरुन येणार असल्याची माहिती मला मिळाली आहे. अशा परिस्थितीत शहरातील वातावरण खराब होऊ नये ही माझ्यासोबतच आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही आमचं साखळी उपोषण स्थगित करत आहोत. तसेच आमच्या निर्णयानंतर जर कोणी काही चिथावणीखोर भाषणे केल्यास त्यानंतर आम्ही पुढच्या आंदोलनाबाबत निर्णय घेऊ, असही जलील यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com