Imtiaz Jalil : महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या ढुमेला निलंबित कधी करणार ?

Aurangabad : पुण्यात जोरदार भाषण करणाऱ्या गृहमंत्री फडणवीस यांना ढुमेंना निलंबित कधी करणार ? असा सवाल केला आहे.
Mp Imtiaz Jalil-Devendra Fadanvis News, Aurangabad
Mp Imtiaz Jalil-Devendra Fadanvis News, AurangabadSarkarnama

Aimim : महिलेशी गैरवर्तन करत तिच्या पती व घरातील लोकांना मारहाण आणि शिवीगाळ करणाऱ्या मद्यधुंद एसीपीला निलंबित कधी करणार? असा सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना केला आहे.

Mp Imtiaz Jalil-Devendra Fadanvis News, Aurangabad
Marathwada Teacher Constituency : चौदा उमेदवार रिंगणात, पण खरी लढत काळे-पाटील यांच्यातच..

औरंगाबादेत (Aurangabad) एसीपी विशाल ढुमे यांनी दारुच्या नशेत एका महिलेशी गैरवर्तन केल्याची घटना काल शहरात घडली. (Imtiaz Jalil) एवढ्यावर न थांबता ढुमे यांनी सदर महिल्याच्या घरी जाऊन देखील गोंधळ घातला आणि तिच्या पती व दिराला मारहाण केली. या प्रकरणी सदर महिलेच्या तक्रारीनंतर ढुमे यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा देखील दाखल झाला.

त्यानंतर त्यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात करण्यात आली. न्यायालयाने आज त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पण नंतर त्यांना जामीनावर सोडण्यात आले. या सगळ्या प्रकरणावर इम्तियाज जलील यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था व उद्योजकांना होणाऱ्या त्रासावर पुण्यात जोरदार भाषण करणाऱ्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ढुमेंना निलंबित कधी करणार? असा सवाल ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

इम्तियाज यांनी फडणवीसांच्या पुणे येथील भाषणाच्या व्हिडिओचा संदर्भ देत ट्विट केले आहे. यातून त्यांनी महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या आणि विनाकारण अनेकांना मारहाण करणाऱ्या औरंगाबादमधील मद्यधुंद एसीपीला तुम्ही कधी निलंबित करणार आहात ? असा सवाल करतांनाच तुमच्या कृती शब्दांपेक्षा मोठ्या आहेत हे दाखवा, असे आवाहन केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com