Imtiaz Jalil : उद्धव ठाकरेंची विनयशिलता पाहून त्यांच्याबद्दलचा आदर वाढला

बंडखोरीमुळे सरकार अडचणीत आलेले असतांना देखील मुख्यमंत्र्यांनी त्रागा केला नाही, की अपशब्द वापरले नाही. (Aimim)
Imtiaz Jalil : उद्धव ठाकरेंची विनयशिलता पाहून त्यांच्याबद्दलचा आदर वाढला
Mp Imtiaz Jalil-Cm Uddhav ThackeraySarkarnama

औरंगाबाद : पक्षातील मंत्री, आमदारांनी बंड पुकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केलेले मनोगत ऐकून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) हे प्रभावित झाले आहेत. ज्या विनयशिलतेने त्यांनी बंडखोर मंत्री, आमदारांना उद्देशून आपली भूमिका अगदी स्पष्टपणे मांडली त्याने विरोधकांना चपराक तर बसलीच. (Aimim) पण माझ्या मनात तुमच्या बद्दल असलेला आदर आणखी वाढला, अशा शब्दात ट्विट करत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

महाविकास आघाडी सरकार कुठल्याही क्षणी कोसळेल अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. नगरविकास मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी जवळपास अख्खी शिवसेनाच फोडली. शिवसेनेत झालेल्या या बंडाळीने राज्यातच खळबळ उडाली. सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेलेल्या एकनाथ शिंदेसह ४३ आमदारांना व शिवसैनिकांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) सांयकाळी पाच वाजता फेबुकच्या माध्यमातून संवाद साधला.

अवघ्या पाच सात मिनिटांच्या आपल्या निवेदनात मुख्यमंत्री हळवे आणि भावूक झाल्याचे पहायला मिळाले. बंडखोरांपैकी एकाही आमदाराने मला फोनवरून तुम्ही आम्हाला मुख्यमंत्रीपदी नको असे सांगितले तर मी एका क्षणात राजीनामा देईन, अशी सडेतोड भुमिका त्यांनी घेतली. बंडखोरीमुळे सरकार अडचणीत आलेले असतांना देखील मुख्यमंत्र्यांनी त्रागा केला नाही, की अपशब्द वापरले नाही.

उलट मी तुम्हाला अजूनही आपला मानतो, तुम्ही मानता की नाही ? अशी भावनिक साद देखील घातली. शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून उद्धव ठाकरे ओळखले जातात. त्यांच्या या गुणामुळे विरोधक देखील त्यांचे कौतुक करतात. पण आज त्यांच्या पक्षाचे बहुतांश आमदार त्यांच्या विरोधात गेल्याचे चित्र आहे. त्यानंतर देखील त्यांनी शिवसैनिकांना उद्देशून केलेल्या भाषणात विनयशीलतेचे दर्शन घडवले.

Mp Imtiaz Jalil-Cm Uddhav Thackeray
आता कसं, शिंदे साहेब म्हणतील तसं ; पहिल्यांदाच आमदार झालेल्या बोरनारेंचेही बंड...

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांच्या या गुणाचे जाहीरपणे कौतुक केले आहे. आपण उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकले असे म्हणत त्यांनी ट्विट केले आहे. तुमच्या सत्यतेचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. आमचे राजकीय/वैचारिक मतभेद असू शकतात पण आज उद्धव ठाकरे यांना ऐकल्यानंतर माझ्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर वाढला आहे. तुमच्या विनयशीलतेने तुमच्या पक्षातील सर्व नाराजांना जोरदार चपराक दिली, असे ट्विट इम्तियाज जलील यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in