Imtiaz Jalil : पवार साहेब, पंतप्रधानांशी मलिकांबद्दल काहीच चर्चा केली नाही का ?

तुमच्या पक्षाचे मंत्री असलेल्या नवाब मलिकांना तुरुगांत डांबण्यात आले आहे, असे असतांना तुम्हाला पंतप्रधानांना भेटावे वाटले नाही, तशी तत्परतता तुम्ही का दाखवली नाही? (Imtiaz Jalil)
Imtiaz Jalil-Sharad Pawar
Imtiaz Jalil-Sharad PawarSarkarnama

औरंगाबाद : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई करताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींची (PM Modi) भेट घेतली. संजय राऊत यांच्यावर ईडीच्या कारवाईची काय गरज होती? असा मुद्दा त्यांनी मोदींच्या भेटीत मांडल्याचे बोलले जाते. (Sharad Pawar) यावरून आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. `नवाब मलिक यांच्याबद्दल काहीही चर्चा न केल्याने तुमच्या मंत्र्याने काही चूक केली असे तुम्हाला वाटते`? असा सवाल इम्तियाज यांनी ट्विट करत विचारला आहे.

तुमच्या पक्षाचे मंत्री असलेल्या नवाब मलिकांना तुरुगांत डांबण्यात आले आहे, असे असतांना तुम्हाला पंतप्रधानांना भेटावे वाटले नाही, तशी तत्परतता तुम्ही का दाखवली नाही? असा टोला देखील त्यांनी ट्विटच्या माध्यमातून लगावला आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी शरद पवार यांच्या मोदी भेटी संदर्भातील मुद्यांचा दाखला देत पवारांना चिमटा काढला आहे.

राष्ट्रवादीचे नेते व महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. गेल्या महिनाभरापासून ते न्यायालयीन कोठडीत आहे. दुसरीकडे काल ईडीने शिवसेनेचे खासदार आणि राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणण्यात महत्वाची भूमिका बजावली त्या संजय राऊत यांच्यावर कारवाई करत त्याचे काही भूखंड व दादरमधील एक फ्लॅट अशी ११ कोटींची मालमत्ता जप्त केली.

या कारवाईनंतर दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी सायंकाळी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे मंत्री नितीन गडकरी हे देखील यावेळी उपस्थित होते. त्यानंतर आज शरद पवारांनी पंतप्रधान कार्यालयात मोदींची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीत नेमकी कोणत्या मुद्यावर चर्चा झाली या संदर्भातील काही मुद्दे प्रसार माध्यमांनी मांडले. याचाच दाखला देत इम्तियाज जलील यांनी शरद पवार यांना काही प्रश्न विचारले.

Imtiaz Jalil-Sharad Pawar
Chikhlikar : पोलिसांवर विश्वास राहिला नाही, पाच दिवसांत आरोपी शोधा नाहीतर रस्त्यावर उतरू..

ट्विटच्या माध्यमातून त्यांनी संजय राऊत यांच्यावर कारवाई झाल्यानंतर पंतप्रधानांची जशी भेट घेतली, तशी तत्परतता नवाब मलिक यांच्यासाठी का दाखवली नाही? त्यांनी काही चुकीचे केले आहे का? असे सवालही इम्तियाज यांनी उपस्थितीत केले आहेत. नवाब मलिक यांच्यावर जेव्हा ईडीने कारवाई करून त्यांना अटक केली होती, तेव्हा एमआयएमने जाहीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली होती.

मुस्लिम म्हणून जर मलिकांना त्रास देणार असाल तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू, अशी भूमिका इम्तियाज जलील यांनी मांडली होती. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा एकदा मलिकांच्या बाजुने सवाल उपस्थितीत करत पवारांवर निशाणा साधला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com