Imtiaz Jalil On Budget : पगारदार वर्गाला दिलासा, शेतकऱ्यांना धक्का देणारे फ्लाॅप बजेट..

Aimim : या वर्षी एकूणच अपेक्षा मोठ्या होत्या पण पुन्हा त्या फोल ठरल्याचे इम्तियाज जलील म्हणाले.
Imtiaz Jalil On budget Neews, Aurangabad
Imtiaz Jalil On budget Neews, AurangabadSarkarnama

Aurangabad : पगारदार वर्ग आयकर भरणाऱ्यांना थोडा दिलासा देऊन सरकारला पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठा फायदा करून घ्यायचा आहे. या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशात भाजपच्या पराभवात पगारदार वर्गाचा मोठा वाटा होता, असे म्हणत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी आयकरात मिळालेल्या सवलतीवर भाष्य केले.

Imtiaz Jalil On budget Neews, Aurangabad
Ambadas Danve On Budget : अपयशी शिंदे-फडणवीसांमुळे बजेटमध्ये महाराष्ट्रावर अन्याय..

हे स्पष्ट होते की पुढील वर्षी हा सरकारचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प (Budget) असल्याने मे २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकांमुळे अंतरिम अर्थसंकल्प सादर करत सरकारला आयकर भरणाऱ्यांना संतुष्ट करायचे होते. (Aimim) मात्र, एमएसपीचे आश्वासन देऊन आणि त्यांचे उत्पन्न वाढवून शेतकऱ्यांना आवश्यक तो दिलासा देण्याबाबत सरकारच्या मौनाने शेतकऱ्यांना धक्का बसला आहे.

शिवाय लाखो तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाईल यावर अर्थमंत्र्यांनी भर दिला असताना, प्रशिक्षणानंतर काय? सरकार बेरोजगारांसाठी किती नोकऱ्या निर्माण करणार आहे ? हे मात्र गुलदस्त्यातच आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी केल्याचाही उल्लेख नाही, ज्याचा सर्वाधिक फटका गरीब आणि मध्यमवर्गीयांना बसला आहे. या वर्षी एकूणच अपेक्षा मोठ्या होत्या पण पुन्हा त्या फोल ठरल्याचे इम्तियाज जलील म्हणाले.

दरम्यान, बजेटच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या मुंबईतील बैठकीत राज्यातील खासदारांनी आपापल्या भागातील प्रश्न आणि त्यासाठी आवश्यक निधी संदर्भात चर्चा केली होती. राज्यातील केंद्राशी संबंधित ६० असे मुद्दे आहेत, ज्यावर वर्षानुवर्ष चर्चा होते पण निर्णय होत नाहीत.

उदाहरणच द्यायचे झाले तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा विषय गेल्या आठ वर्षापासून मांडला जातो. पण त्यावर काहीच निर्णय होत नाही. राज्यात शिंदे-फडणवीसांचे आणि केंद्रात त्यांचाच पक्षाचे सरकार आहे. मग आम्हाला सांगण्यापेक्षा त्यांनीच केंद्राकडे पाठपुरावा करून हा प्रश्न आतापर्यंत का सोडवला नाही? असा सवाल देखील इम्तियाज यांनी उपस्थीत केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com