Imtiaz Jalil News : देसाईसाहेब माझ्याविरोधात मानहानीचा खटला कधी दाखल करणार ? तो कराच..

Aimim : त्यांना माझे आव्हान आहे की जर त्यांनी आणि त्यांच्या मुलाने भ्रष्टाचार केला नाही, तर त्यांनी लवकरच हा खटला दाखल करावा.
Mp Imtiaz Jalil-Subhash Desai News, Aurangabad
Mp Imtiaz Jalil-Subhash Desai News, AurangabadSarkarnama

Marathwada : माजी मंत्री उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्रातील राखीव औद्योगिक जमिनी निवासी/व्यावसायिक जमिनीत रूपांतरित करून मोठ्या बिल्डरांकडून कोट्यवधी रुपये घेऊन मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी केला होता. त्यानंतर सुभाष देसाई यांनी आपण इम्तियाज जलील यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे जाहीर करत माफी मागण्याचे आवाहन केले होते.

Mp Imtiaz Jalil-Subhash Desai News, Aurangabad
Ashok Chavan News : काॅंग्रेसशासित तीन्ही राज्यात जुनी पेन्शन योजना ; आम्ही जे सांगतो ते करतोच..

या घटनेला आज बरोबर एक महिना झाला. परंतु सुभाष देसाई यांनी खटला दाखल करण्यासंदर्भात काहीच हालचाली केल्या नाही. सुभाष देसाईंवर (Subhash Desai) भ्रष्टाचाराचे आरोप करून महिना उलटल्याचा मुहूर्त साधत इम्तियाज जलील यांनी त्यांना पुन्हा आठवण करून देत माझ्यावर मानहानीचा खटला दाखल करणार होतात? त्याचे काय झाले? (Aimim) तो कराच, म्हणजे न्यायालयात सत्य काय आहे? ते स्पष्ट होईल, असे ट्विट करत आव्हान दिले आहे.

इम्तियाज जलील यांनी २८ डिसेंबर रोजी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेत सुभाष देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गेल्या वर्षभरात विशेषतः औरंगाबाद चिकलठाणा एमआयडीसीतील औद्योगिक वापराच्या भुखंडाचा मुळ उद्देश बदलून सबसिडीमध्ये, रोजगार उपलब्ध होणार म्हणून दिलेल्या भुखंडावर निवासी, वाणिज्य वापरासाठी दिले गेले. प्रत्येकी एका प्लाॅटच्या उद्देश बदलण्यासाठी २ कोटी रुपये घेण्यात आले असून यातून तत्कालीन उद्योग मंत्र्यांनी शंभर ते सव्वाशे कोटींचा भ्रष्टाचार केला आहे.

राज्यात अशा प्रकारचे ३२ हजार एकर औद्योगिक भूखंडांचे उद्देश बदलण्यात आल्याचा दावा देखील इम्तियाज जलील यांनी केला होता. उद्योगमंत्री म्हणून सुभाष देसाई नवे उद्योग तर शहरात, राज्यात आणू शकले नाही, पण औद्योगिक वापराच्या भुखंडाचे उद्देश बदलून कोट्यावधी रुपये कमावले आहेत. एमआयडीसीमधून आपण गेल्या वर्षभरातील अशा इंडस्ट्रीयल प्लाॅटची माहिती मागवली होती. आता प्रत्येक प्रकरणात एसआयटी चौकशीची मागणी करणाऱ्या आणि ती मान्य करणाऱ्या सरकारने याची देखील चौकशी करावी, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली होती.

एकट्या औरंगाबादमध्ये शंभर-सव्वाशे कोटींचे प्रकरण समोर आले आहे, मग राज्यातील मोठ्या शहरातील एमआयडीसीमधील किती भूखंडांचे उद्देश बदलण्यात आले असतील, याचा अंदाज लावला तर हा घोटाळा एक हजार कोटींच्यावर जाईल. गेल्या दहा-पंधरा वर्षात राज्यातील ३२ हजार एकर इंडस्ट्रीयल भुखंडांचे उद्देश बदलण्यात आले आहेत, यात नारायण राणे, उद्योगमंत्री असतांनांच्या काळातील काही एमआयडीसीतील भुखंडाचा देखील समावेश असल्याचा आरोप करत इम्तियाज जलील यांनी खळबळ उडवून दिली होती.

Mp Imtiaz Jalil-Subhash Desai News, Aurangabad
Mla Santosh Danve News : सकाळी मफलर, दुपारी ब्लेझर, संध्याकाळी फाॅर्मल; दानवेंच्या लूकची चर्चा..

यावर सुभाष देसाई यांनी नागपूर अधिवेशन काळातच इम्तियाज जलील यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळत माफी मागा नाहीतर, न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करेन, असा इशारा दिला होता. पण महिना उलटला तरी देसाईकडून कुठल्याच प्रकारचे पाऊल उचलले गेले नाही. त्यावर आज इम्तियाज जलील यांनी ट्विट करत सुभाष देसाई यांना पुन्हा एकदा डिवचले. इम्तियाज जलील आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, माजी मंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्रातील राखीव औद्योगिक जमिनी निवासी/व्यावसायिक जमिनीत रूपांतरित करून मोठ्या बिल्डरांकडून कोट्यवधी रुपये घेऊन मोठा भ्रष्टाचार केला आहे.

मी हा भ्रष्टाचार बाहेर आणल्यानंतर ते माझ्याविरोधात न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करणार होते. परंतु अद्यापपर्यंत त्यांनी हा खटला दाखल केला नाही. त्यांना माझे आव्हान आहे की जर त्यांनी आणि त्यांच्या मुलाने भ्रष्टाचार केला नाही, तर त्यांनी लवकरच हा खटला दाखल करावा. आता न्यायालयातच हे स्पष्ट होईल की कोणाची बाजू योग्य आहे . Will expose this massive corruption in court.यानंतर आता सुभाष देसाईंकडून काय उत्तर दिले जाते, हे पहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com