Imtiaz Jalil News : मुशायरा, कव्वालीच्या कार्यक्रमात गर्दी करणारे आंदोलनात का येत नाहीत ?

Chhatrapati Sambhajinagar : तुमच्यातच लढण्याची इच्छा नसेल तर कसे होणार? अशी खंत देखील इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली.
Imtiaz Jalil Neews, Chhatrapati Sambhajinagar
Imtiaz Jalil Neews, Chhatrapati SambhajinagarSarkarnama

Aimim : मुशायरा, कव्वालीचा कार्यक्रम ठेवला होता तेव्हा हजारोंची गर्दी जमली होती. मी २१ दिवसांचा आयजे महोत्सव ठेवला, तिथे क्रिकेट, फुटबाॅल पहायला हजारोंची गर्दी व्हाययची. मग आता औरंगाबाद (Aurangabad) नावासाठी जी लढाई मी सुरु केली आहे, त्यासाठीच्या आंदोलनाला लोक का येत नाहीयेत? कुठे गेली ती गर्दी? असा संतप्त सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी आंदोलनस्थळी केला.

Imtiaz Jalil Neews, Chhatrapati Sambhajinagar
Ambadas Danve : पालकमंत्र्यांच्या मतदारसंघाला अर्थसंकल्पात ठेंगा, दानवे म्हणाले, तुम्ही पैठणचे नाथ सोडले अन् ..

गेल्या नऊ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्या नेतृत्वाखाली नामांतरविरोधी कृती समितीचे उपोषण सुरू आहे. दोन दिवासंपुर्वी काढलेल्या कॅन्डल मार्चला देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता. (Aimim) परंतु जसजसे आंदोलन लांबत आहे, तशी येथील गर्दी ओसरू लागली आहे. इम्तियाज जलील उपस्थितीत असतील तेव्हा मंडप भरलेला असतो, पण ते निघून गेल्यानंतर इतर लोकही निघून जातात हे चित्र आहे.

यावर संतप्त झालेल्या इम्तियाज जलील यांनी आंदोलनस्थळी तरुण, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरवासियांना देखील सुनावले. इम्तियाज जलील म्हणाले, शहरातील अनेक हाॅटेल, पान टपरी, चौकात तरुणांची गर्दी आहे, पण औरंगाबाद शहरासाठी मी उभारत असलेल्या लढ्याच्या आंदोलनात सहभागी व्हायला कुणाला वेळ नाही. फक्त काही लोकांच्या पाठिंब्यांचे पत्र, हजारोंच्या सह्या केलेले आक्षेप अर्ज ही निराशा का?

ज्या शहरवासियांनी मला लाखो मते देवून विजयी केले, ते आज कुठे आहेत? आमच्यातील लढण्याची हिमंत संपली आहे का? सध्या आमच्या आंदोलनाची चर्चा विधानसभा, विधान परिषद, दिल्लीत देखील होत आहे. सगळ्यांच्या नजरा आमच्याकडे लागलेल्या आहेत. पण आम्ही मात्र घरात बसून आहोत. मी हा लढा वैयक्तिक फायद्यासाठी सुरू केलेला नाही.

औरंगाबाद शहराचे नाव आणि इतिहास कायम राहावे यासाठी उभारला आहे. पण तुम्हाला जर तो नको असेल, तर दहा मिनिटात आंदोलन संपू शकते. मी प्रामाणिकपणे लढा देत आहे, त्यात तुमची साथ मिळाली नाही, तरी उद्या मला समाधान असेल की मी शहरासाठी मनापासून लढलो. सरकारकडून आंदोलन संपवावे यासाठी दबाव येत आहे, पण मी दबावाला बळी पडलो नाही. पण तुमच्यातच लढण्याची इच्छा नसेल तर कसे होणार? अशी खंत देखील इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com