Imtiaz Jalil News : बाहेरून गुंडांना बोलावून अशांतता निर्माण केल्याबद्दल नेत्यांचे धन्यवाद...

Chhatrapati Sambhajinagar : सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि आमदार लव्ह जेहाद, शहराच्या नामांतराला विरोध करण्यासाठी मेळावे आयोजित करण्यात व्यस्त.
Imtiaz Jalil Sambhajinagar News
Imtiaz Jalil Sambhajinagar NewsSarkarnama

Aimim : छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ आणि लव्ह जिहाद विरोधी कायद्याची मागणी करत सकल हिंदू एकत्रिकरण समितीच्या वतीने शहरात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर काही किरकोळ घटना घडल्या, मात्र या मोर्चावर टीका करतांना (Aimim) एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी गंभीर आरोप केले आहेत. बाहेरून गुंड बोलावून शहरात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न स्थानिक नेत्यांनी केल्याचा आरोप करत त्यांनी उपरोधिक टीका केली आहे.

Imtiaz Jalil Sambhajinagar News
Hindu Jan Garjana March News : `औरंगाबाद` वर चिखल अन् दगडफेक, इम्तियाज यांच्या नावाला शाई फासली..

या संदर्भात ट्विट करत त्यांनी स्थानिक तसेच राज्यस्तरावरील नेत्यांना देखील लक्ष्य केले. इम्तियाज (Imtiaz Jalil) यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, शांतता राखा, बाहेरून आलेल्या काही गुंडांच्या घाणेरड्या खेळाला आपण बळी पडू नये. (Aurangabad) आपल्या सर्वांना हे शहर आवडते, पोलीस त्यांचे काम करत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात गारपिटीमुळे ६२ हजार हेक्टर शेतजमीन पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. ७६ जनावरे ठार झाली, तर ६ मानवी जीव गेले आहेत.

शेतकर्‍यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्यापर्यंत पोहोचण्याऐवजी सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि आमदार लव्ह जेहाद, शहराच्या नामांतराला विरोध करण्यासाठी मेळावे आयोजित करण्यात व्यस्त आहेत. यालाच मी खर्‍या समस्यांकडे कानाडोळा करणे आणि लोकांना भावनिक गोष्टींमध्ये गुंतवून ठेवण्याची रणनिती म्हणतो.

मला देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांचे देखील धन्यावाद मानायचे आहेत. आमच्या राष्ट्रीय वीरांच्या नावाने गलिच्छ राजकारण करण्यासाठी बाहेरून गुंडांना बोलावून अशांतता निर्माण केल्याबद्दल माझ्या जिल्ह्यातील सर्व स्थानिक नेत्यांचे देखील आभार ! आम्हाला शांतता, प्रेम आणि सुसंवाद हवा आहे. अशा शब्दात इम्तियाज जलील यांनी उद्विग्नता व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com