Imtiaz Jalil News : मनसे चिल्लर पार्टी, अशा पक्षाबद्दल मी बोलत नाही..

Aimim : इम्तियाज यांच्या या टीकेनंतर आता नामांतरावरून या दोन पक्षात संघर्ष भडकण्याची शक्यता आहे.
Mp Imtiaz Jalil, Raj Thackeray News
Mp Imtiaz Jalil, Raj Thackeray NewsSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर या नावाला विरोध केल्याबद्दल मनसेने आपल्याला खासदारकीचा राजीनामा देण्याचे आवाहन केले आहे, यावर ` मी मनसे सारख्या चिल्लर पार्टीबद्दल बोलत नाही`. अशा शब्दात इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी टीका केली. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर झाल्यापासून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या विरोधात भूमिका घेत आंदोलन सुरू केले आहे.

Mp Imtiaz Jalil, Raj Thackeray News
Chhatrapati Sambhajinagar News : नामांतराच्या समर्थनात मनसेची स्वाक्षरी मोहिम..

आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इम्तियाज यांच्या नेतृत्वाखाली नामांतरविरोधी कृती समितीचे साखळी उपोषण सुरू करण्यात आले. (Aimim) यावेळी माध्यमांनी इम्तियाज यांना मनसेने केलेल्या टीके संदर्भात विचारले. त्यावर ते म्हणाले, (MNS) मनसे ही चिल्लर पार्टी आहे, त्याबद्दल मी बोलणार नाही. जे आज इथे, तर उद्या तिथे अशी भूमिका घेवून फिरत असतात, त्यांच्याबद्दल बोलायला मला वेळ नाही.

इम्तियाज यांच्या या टीकेनंतर आता नामांतरावरून या दोन पक्षात संघर्ष भडकण्याची शक्यता आहे. एमआयएमने नामांतराला विरोध सुरू केला तेव्हापासूनच मनसेने आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. त्यानूसार आज इम्तियाज यांनी नामांतराच्या विरोधात साखळी उपोषण सुरू करताच मनसेने छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहिम सुरू केली.

इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध असले तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, आपल्या मुलांची नावे औरंगजेब ठेवावीत. रस्त्यावर उतरण्याची भाषा केली तर त्याला मनसे जशास तसे उत्तर देईल, असा इशाराही दिला होता. त्यानंतर आज इम्तियाज यांनी मनसेला चिल्लर पार्टी म्हणत खिल्ली उडवली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com