Imtiaz Jalil News : एमआयएमचा पोलिसांवर रोष, पण न्यायालयाचा निर्णय मान्य करणार..

Aimim : बाहेरच्या राज्यातील नेत्यांना शहरात आणून येथील शांतता बिघडवण्याचे काम का सुरू केले आहे? त्यांनी देखील न्यायालयीन लढा लढावा.
Imtiaz Jalil Sambhajinagar News
Imtiaz Jalil Sambhajinagar NewsSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराच्या विरोधात १४ दिवसांचे साखळी उपोषण नुकतेच मागे घेतले. दरम्यान, त्यांनी काढलेल्या कॅन्डल मार्च, व साखळी उपोषणाच्यावेळी आपल्याला पोलिसांचा वाईट अनुभव आल्याचे सांगत पोलिस राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसारखे वागल्याचा आरोप इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी केला.

Imtiaz Jalil Sambhajinagar News
Chandrakant Khaire News : आम्ही २८ वर्ष शांत ठेवलेले शहर एमआयएम-भाजप पुन्हा पेटवू पाहत आहेत..

एवढेच नाही तर त्यांनी अंगावरची वर्दी उतरवून, शिवसेना किंवा बजरंग दलात सामील व्हावे, असा संतापही व्यक्त केला. (Shivsena) एकीकडे त्यांचा पोलिसांवर रोष दिसून आला, तर दुसरीकडे न्यायालयावर आपला विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले. (Aimim) न्यायालयात प्रकरण असतांना सत्ताधाऱ्यांना त्याला जुमानले नाही आणि हुकमशाही पद्धतीने शहराचे नामांतर आमच्यावर लादले.

अधिसूचना काढून शहरातील सरकारी कार्यालयांमधील पाट्या देखील बदलल्या जात आहे. लोकशाहीने आम्हाला याचा विरोध करण्याचा आणि न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार दिला आहे. तसा नामांतराचे समर्थन करणाऱ्यांना देखील आहे. मग त्यांनी तो मार्ग न स्वीकारता, मोर्चे काढत, बाहेरच्या राज्यातील नेत्यांना शहरात आणून येथील शांतता बिघडवण्याचे काम का सुरू केले आहे? त्यांनी देखील न्यायालयीन लढा लढावा.

Imtiaz Jalil Sambhajinagar News
Sanjay Raut : शिंदे-फडणवीस सरकारला चुंबनाचे वावडे कधीपासून ? ; दोघेही उघडपणे अनैतिक पद्धतीने एकत्र राहताहेत..

साखळी उपोषण मागे घेतले असले तरी आमचा न्यायालयीन लढा आम्ही सुरूच ठेवणार आहोत. आजही न्यायालयावर आमचा पुर्ण विश्वास आहे. न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल. यापुर्वी बाबरी मशिद व इतर प्रकरणात न्यायालयाचे निर्णय आम्ही स्वीकारले आहेत. पण आम्हाला लोकशाही मार्गाने तिथे दाद मागण्याचा अधिकार आहे की नाही? असा सवाल देखील इम्तियाज यांनी उपस्थितीत केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com