Imtiaz Jalil News : योग्यवेळी बोलू, शिवसेना-वंचित युतीवर एमआयएमची सावध भूमिका..

Aurangabad : युतीचा फायदा एकतर्फी एमआयएमला झाल्याचे स्पष्ट झाले आणि अवघ्या सात महिन्यात वंचित-एमआयएम वेगळे झाले.
Mp Imtiaz Jalil-Prakash Ambedkar News, Aurangabad
Mp Imtiaz Jalil-Prakash Ambedkar News, AurangabadSarkarnama

Aimim : प्रकाश आंबेडकर मेरे बडे भाई है, असे म्हणत त्यांना भर सभेत खांद्यावर उचलून घेणारे एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owasi) आणि त्यांच्या पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी सध्या सावध भूमिका घेतल्याचे दिसत आहे. वंचितसोबतच्या आघाडीमुळे औरंगाबादेत एमआयएमचा खासदार निवडून आला याची जाणीव अजूनही या दोन्ही नेत्यांना आहे.

Mp Imtiaz Jalil-Prakash Ambedkar News, Aurangabad
Marathwada Teacher Constituency : प्रचार थांबला, सोमवारी मतदान ; काळे-पाटील यांच्यात थेट लढत..

त्यामुळे वंचित-शिवसेना युतीवर कुठलेही भाष्य करायचे नाही, असे धोरण सध्या पक्षाने ठरवल्याचे दिसते. इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना वंचित-शिवसेना युतीवर भाष्य करणे टाळले. या संदर्भात आमचे नेते ओवेसी ठरवतली त्यावेळी भूमिका स्पष्ट करू, असे सांगत वंचित बाबत आपल्या पक्षाची भूमिका मवाळ असल्याचे संकते एमआयएमने (Aimim) दिले आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी मार्चमध्ये झालेल्या वंचित-एमआयएम युतीने राज्याच्या राजकारणात एक नवे समीकरण निर्माण केले होते. या युतीने अनेकांच्या उरात धडकी भरवत लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यासह राज्यात हजारोंची मतं मिळवली होती. औरंगाबादेत तर या पक्षाचा खासदार निवडून आला. परंतु या युतीचा फायदा एकतर्फी एमआयएमला झाल्याचे निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले आणि लोकसभेला झालेली युती अवघ्या सात महिन्यात विधानसभेला तुटली.

एमआयएमकडून ती टिकवण्याचे प्रयत्न झाले, पण दलितांची एकगठ्ठा मते एमआयएमला मिळाली, पण मुस्लिमांची वंचितला नाही, हे स्पष्ट झाल्याने प्रकाश आंबेडकरांनी वेगळे होणे पसंत केले. याचा फटका दोन्ही पक्षांना विधानसभेत बसला. दरम्यान, गेल्या अडीच वर्षात राज्यातील राजकारणात अनेक भुंकप घडले. शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमत असतांना राज्यात शिवसेना-काॅंग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांची महाविकास आघाडी सत्तेवर आली.

अडीच वर्षानंतर पुन्हा भूकंप झाला, शिवसेना फुटली आणि शिंदे गटाच्या मदतीने भाजप पुन्हा सत्तेवर आली. फुटलेल्या शिवसेनेला आणि वंचितला देखील नव्या मित्राची गरज होती, ती शिवशक्ती-भीमशक्तीच्या रुपाने पुर्ण झाली. या नव्या युतीमुळे महाविकास आघाडीत खडके उडत असले तरी हा नवा प्रयोग किती यशस्वी होतो हे मुंबई महापालिकेच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

Mp Imtiaz Jalil-Prakash Ambedkar News, Aurangabad
Ashok Chavan News : काॅंग्रेसशासित तीन्ही राज्यात जुनी पेन्शन योजना ; आम्ही जे सांगतो ते करतोच..

दरम्यान, या नव्या युतीबद्दल एमआयएमकडून कमालीचा संयम बाळगला जातोय. ठाकरे-आंबेडकर एकत्र आल्यानंतर सगळ्या राजकीय पक्षांनी आपल्या भूमिका मांडल्या. पण वंचितचा जुना मित्र असलेल्या एमआयएमने मात्र वेट अॅन्ड वाॅचची भूमिका घेतली आहे. खासदार ओवेसी, इम्तियाज या दोघांनी देखील तुर्तास यावर कुठलेच भाष्य करायचे नाही, असे ठरवले आहे. योग्यवेळी यावर आमची भूमिका मांडू असे इम्तियाज जलील सांगत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com