Imtiaz Jalil News : भाजपला रोखण्याची इच्छा असणाऱ्या पक्षांसोबत युती करू..

Mumbai : भाजपला रोखण्यासाठी जे काही करायचे आहे, ते करण्याची आमची तयारी आहे.
Mp Imtiaz Jalil News, Sambhajinagar
Mp Imtiaz Jalil News, SambhajinagarSarkarnama

Aimim : आगामी महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत जो कोणता पक्ष मनापासून भाजपलो रोखण्याची इच्छा बाळगून मैत्रीचा हात पुढे करेल, त्याला आम्ही सोबत घ्यायला तयार आहोत, अशा शब्दात (Aimim) एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबईतील पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनात युतीबद्दलची भूमिका स्पष्ट केली.

Mp Imtiaz Jalil News, Sambhajinagar
Ashok Chavan News : न्यायमुर्ती स्वतःला सुरक्षित समजत नाहीत, लोकांनी न्याय मागायला कुठे जायचे?

अवघ्या सात महिन्यात वंचित बहुजन आघाडीसोबतची युती तुटल्यानंतर एमआयएमला आता नव्या मित्राची गरज भासू लागली आहे. (Imtiaz Jalil) देशातील अनेक पक्षांशी आपली बोलणी सुरू असल्याचे इम्तियाज जलील यांनी यापुर्वी सांगितले होते. (Mumbai) आजच्या राष्ट्रीय अधिवेशनानिमित्त पुन्हा यावर चर्चा झाली.

त्या त्या राज्यांमध्ये कोणासोबत युती करायची याबाबत तिथल्या प्रदेशाध्यक्षांनी सुचवावे, त्यावर पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी हे निर्णय घेणार असल्याचेही इम्तियाज यांनी सांगितले. मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलतांना इम्तियाज जलील म्हणाले, या देशात भाजपला रोखण्यासाठी जे काही करायचे आहे, ते करण्याची आमची तयारी आहे.

ज्या पक्षांना मनापासून भाजपला या देशातून संपवण्याची इच्छा आहे, त्यांनी आमच्यासोबत यावे, त्यांचे निश्चितच स्वागत केले जाईल. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे, जे नाव दिले, त्या नावाच्या दर्जाप्रमाणे शहर करणार आहात का? असा सवाल देखील त्यांनी केला. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नवी समीकरणे उदयास येत आहेत.

नुकतीच वंचित बहुजन आघाडीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती केली. आता एमआयएमनेही युतीबाबत सकारात्मक धोरण अवलंबले आहे. देशातील कोणते पक्ष एमआयएमसोबत येतील याबाबत चाचपणी केली जाणार असल्याचे इम्तियाज यांनी सांगितले. पण भाजपला रोखण्याची प्रबळ इच्छा त्या पक्षात हवी हीच आमची अट असल्याचे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in