मुख्यमंत्र्यांच्या विधानाचं स्वागत करताना इम्तियाज जलीलांनी लगावला टोला ; म्हणाले..

महाराष्ट्राच्या विकासाबाबत काय ? त्यावर बोलले असते तर आम्हाला आनंद झाला असता," असा टोला जलील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
 Uddhav Thackeray, Imtiaz jalil
Uddhav Thackeray, Imtiaz jalilsarkarnama

औरंगाबाद :शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी कालच्या आपल्या भाषणात 'मुस्लिम द्वेष नाही,' असे विधान केलं. या विधानाचं स्वागत औरंगाबादचे खासदार, एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiaz jalil) यांनी केलं आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. (Imtiaz jalil news)

"भाजप प्रवक्त्याने प्रेषित पैगंबर बाबत केलेल्या विधानामुळे देशाची नाचक्की झाली. मात्र, हे विधान भाजपने केले आहे.त्यामुळे भारत माफी मागणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. ही भूमिका योग्य असून भूमिकेचे आम्ही समर्थन करीत आहोत, असे खासदार जलील म्हणाले.

 Uddhav Thackeray, Imtiaz jalil
मुंडे, महाजनांना राजकारणातून संपविण्यासाठी कोणीतरी पडद्यामागून प्रयत्न करतयं !

"शहराच्या पाणी प्रश्नावर बोलताना ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश दिले असे त्यांनी सांगितले. मात्र या गोष्टींशी नागरिकांना घेणे देणे नाही पाणी कधी देणार ते सांगा. तुमच्या बोलण्यावरून पुढील तीन वर्ष तरी पाणी मिळणार नाही, असे दिसत असल्याचे असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.

"उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात बाबरीवर बरंच वेळ घातला. त्या घटनेला आता तीस वर्ष झाली. आता महाराष्ट्राच्या विकासाबाबत काय ? त्यावर बोलले असते तर आम्हाला आनंद झाला असता," असा टोला जलील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

 Uddhav Thackeray, Imtiaz jalil
विधान परिषदेसाठी भाजपकडून सहावा उमेदवार म्हणून सदाभाऊ खोतांना संधी..

"भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशाला धमक्या दिल्या जात आहे, त्याला भाजप जबाबदार आहे. भाजपमुळे देशात दहशतवाद वाढत आहे. देशात सर्व व्यवस्थित सुरू असताना भाजपचे प्रवक्ता देशातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, याला भाजप जबाबदार आहे," असा आरोप खासदार संजय राऊतांनी काल केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com