सरकारनामा Open Mic : इम्तियाज जलील यांचा साधेपणा; कोणताही बडेजाव न करता सोडला रोजा

imtiaz jaleel : अत्यंत साधेपणात सोडला रोजा
Mp Imtaiz Jalil
Mp Imtaiz JalilSarkarnama

पुणे : सरकारनामा ओपन माईक या कार्यक्रमासाठी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आज पुण्यामध्ये आहेत. या दरम्यान त्यांनी कार्यक्रमाच्यामध्येच कोणताही बडेजाव किंवा गाजावाजा न करता, कोणताही अडथळा न आणता बाजूला जावून नमाज अदा करत आपला रोजा सोडलेला पाहायला मिळाला.

सध्या रमजानचे दिवस सुरु आहेत. अशातच आता सरकारनामाच्या ओपन माईक कार्यक्रम पुण्यातील बाणेर भागातील एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यमंत्री आदिती तटकरे, कॉंग्रेसचे आमदार धीरज देशमुख, शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाजपचे आमदार परिणय फुके आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान संध्याकाळी रोजा सोडण्याची वेळ झाली. योगायोगाने त्याच वेळी कार्यक्रमात काही क्षणाची विश्रांती घेण्यात आली. यावेळी खासदार इम्तियाज जलिल यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणीच कोणताही बडेजाव किंवा गाजावाजा न करता, कोणताही अडथळा न आणता बाजूला जावून नमाज अदा केली आणि खजूरसोबत काही फळ खावून रोजा सोडला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com