Imtiaz Jaleel : मेट्रो नको, डीपीआरवर होणारा कोट्यावधींचा खर्च विकास कामांवर खर्च करा..

औरंगाबाद शहराचा विकास आराखडा पाहता सध्या तरी मेट्रोलाईन शक्यच नाही. सबब हा निधी शहरातील उद्याने व सद्यस्थितीत गरज असलेल्या लोकोपयोगी विकास कामांसाठी वापरा. (Mp Imtiaz Jaleel)
Mp Imtiaz Jaleel-Astikkumar Pandey
Mp Imtiaz Jaleel-Astikkumar PandeySarkarnama

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत साडेसात कोटी रुपये खर्च करुन मेट्रोलाईनसाठी तयार करण्यात येणाऱ्या डीपीआरला विरोध दर्शवला आहे. (Mp Imtiaz Jaleel) हे काम तातडीने थांबवून त्याला स्थगिती देण्याची मागणी त्यांनी स्मार्ट सिटीचे सीईओ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. (Aimim) नागरीकांच्या प्राथमिकता असलेल्या व सद्यस्थितीत अत्यावश्यक विकास कामे व प्रकल्पांना प्राधान्य देण्याची सूचना देखील त्यांनी आस्तिक कुमार पांडेय यांना केली आहे.(Aurangabad)

स्मार्टसिटी प्रकल्पातंर्गत औरंगाबाद शहरात विविध प्रकल्प राबविले जात असुन जे प्रकल्प वास्तविकतेत शक्य आहे व सर्वसामान्य नागरीकांच्या हिताचे आहेत त्यावरच निधी खर्च करणे योग्य ठरेल अशी भूमिका घेत खासदार इम्तियाज जलील यांनी मेट्रोलाईनच्या डीपीआरवर होणारा खर्च वाया जाणार असल्याचे म्हटले आहे.

स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पांडेय यांना पाठवलेल्या पत्रात इम्तियाज जलील म्हणतात, औरंगाबाद शहरात मेट्रोलाईनचा डिपीआर महारेल संस्थेमार्फत तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याकरिता स्मार्टसिटी बजेट मधून महारेल संस्थेला साडेसात कोटी अदा करण्यात येणार असल्याचे समजते. सेंट्रल अर्बन डेव्हलपमेंट कमिटीचा मी सदस्य असुन ही कमिटी संपुर्ण भारतातील विविध शहरात राबविण्यात येणारे विकासात्मक कामे व प्रकल्पांचे निरीक्षण करते.

महारेल संस्था हि फक्त भरमसाठ फीस वसुल करुन जे शक्य होणार नाही असे डिपीआर बनविण्याचे काम करत असल्याचे कमिटीच्या निदर्शनास आले आहे. मेट्रोलाईन प्रकल्प हा पूर्णपणे खाजगी तत्वावर चालतो त्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध करुन दिला जात नाही, मेट्रोलाईन प्रकल्प सुरु करण्यास हजारो कोटींची आवश्यकता भासणार आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पात महानगरपालिका निधी देऊच शकत नाही. मग मेट्रोलाईन प्रकल्पात हजारो कोटी रुपयांचा वाटा कसा व कुठुन आणणार ? असा सवाल देखील इम्तियाज यांनी केला. तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सद्यस्थितीत केंद्र शासनाकडून उर्वरित निधी मिळविण्यासाठी औरंगाबाद मनपाच्या हिस्याची रक्कम आतापर्यंत भरण्यात आली नाही. त्याकरिता मनपाकडून अनेक प्रयत्न सुरु आहे.

Mp Imtiaz Jaleel-Astikkumar Pandey
मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहणाला विरोध करणाऱ्या भाजपने अटकेनंतर फटाके फोडले..

स्मार्टसिटी अंतर्गत महारेल संस्थेस मेट्रोलाईनचा डिपीआर बनविण्यास देण्यात येणारे रुपये साडेसात कोटी पूर्णपणे वाया जाणार आहेत. औरंगाबाद शहराचा विकास आराखडा पाहता सध्या तरी मेट्रोलाईन शक्यच नाही. सबब हा निधी शहरातील उद्याने व सद्यस्थितीत गरज असलेल्या लोकोपयोगी विकास कामांसाठी वापरावा. शहराला फक्त काही जंक्शन आणि विशेषत: जालना रोडवर उड्डाणपूल हवे आहेत आणि ते अत्यंत महत्त्वाचे असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी नमुद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com