खैरेंच्या डोक्यावर परिणाम, मी क्लिअर तुमचं पुढे काय होईल ते पहा..शिरसाट-खैरे भिडले..

खैरे म्हणाले, वडगाव-बजाजनगर ग्रापंचायत शिवसेनेच्या ताब्यात होती. शिरसाट यांनी यावेळी आमच्याच उमेदवारांना तुम्हाला कामं देतो म्हणून पळवले आणि त्यांना निवडून आणले. (Khaire-Shirshat)
Mla Sanjay Shirsat-Chandrakant Khaire News, Aurangabad
Mla Sanjay Shirsat-Chandrakant Khaire News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या पश्चिम मतदारसंघातील व जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत त्यांनी बहुमतासह जिंकली. (Shivsena) शिवसेना विरुद्ध शिंदे सेना या संघर्षात शिरसाट यांची सरशी झाली. त्यानंतर आता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि संजय शिरसाट यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा कलगितुरा रंगला आहे.

वडगाव-बजाजनगर ग्रामपंचायत निवडणुकीत संजय शिरसाट यांच्या पॅनलने १७ पैकी ११ जागा जिंकल्या, तर शिवसेनेला फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेने पुर्ण ताकद लावल्यानंतरही मतदारांनी (Sanjay Shirsat) शिरसाट यांच्या पारड्यात मतं टाकली, पण मुख्यमंत्र्यांकडून मिळालेली रसद आणि आमचेच उमेदवार पळवल्यामुळे शिरसाट यांच्या गटाला ११ जागा मिळाल्याचा आरोप खैरे यांनी केला होता.

या आरोपाला `खैरेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे`, असे म्हणत शिरसाटांनी पलटवार केला आहे. बंडखोरीनंतरच्या पहिल्याच निवडणुकीत जिल्ह्यात शिरसाट-भुमरे-सत्तार या त्रिकुटाची सरशी झाली. सगळ्यांनी आपल्या ग्रामपंचायती राखल्याने शिंदे गट सध्या जोरात आहे. शिवसेनेने मात्र हा विजय मुख्यमंत्र्यांनी पोहचवलेलल्या रसदीचा असल्या आरोप केला आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी या विजयाचे श्रेय बंडखोर आमदारांना न देता अमिष आणि मुख्यमंत्र्यांनी पोहचवलेल्या रसदीला दिले.

खैरे म्हणाले, वडगाव-बजाजनगर ग्रापंचायत शिवसेनेच्या ताब्यात होती. शिरसाट यांनी यावेळी आमच्याच उमेदवारांना तुम्हाला कामं देतो म्हणून पळवले आणि त्यांना निवडून आणले. शिवसेनेचे उमेदवार अगदी कमी मतांनी हरले, जे निवडून आले त्यांनाही भरपूर मते मिळाली आहेत. त्यामुळे हा विजय म्हणजे मतदारांनी त्यांच्या गद्दारीला माफ केले असे समजण्याचे कारण नाही.

यावर संजय शिरसाट यांनी खैरे यांचे आता वय झाले आहे, त्यानूसार त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याची खोचक टीका केली. मुख्यमंत्र्यांनी रसद पुरवली, उमेदवार पळवले या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. झालेला पराभव हा मोठ्या मनाने स्वीकारला पाहिजे.

Mla Sanjay Shirsat-Chandrakant Khaire News, Aurangabad
shivsena : दोन वर्ष ताटकळत ठेवल्यानंतर तनवाणींची महानगरप्रमुख पदावर बोळवण..

माझे पॅनल पराभूत झाले असते तर विरोधकांनी आणि प्रसार माध्यमांनी देखील कठोर शब्दात आमच्यावर टीका केली असती. पण मतदारांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, या ग्रामपंचायतीमध्ये गेली पाच वर्ष आम्ही जी विकासकामे केली, त्याला मतदारांनी पावती दिली आहे.

त्यामुळे बिनबुडाचे आरोप करण्यात काही अर्थ नाही. खैरे हे मी मातोश्रीशी किती एकनिष्ठ आहे, हे दाखवण्यासाठी असे आरोप करत आहेत, असा टोला देखील शिरसाट यांनी लगावला. खैरे यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या एका महिला उमेदवाराबद्दल अपशब्द वापरल्याचे सांगत शिरसाट म्हणाले, संजय राऊत बंडखोर आमदारांना वेश्या म्हणाले होते, त्यांना जेलमध्ये जावे लागले.

खैरे महिलांबद्दल अपशब्द वापरतील तर त्यांना देखील जेलमध्ये जावे लागेल. यावर मी क्लिअर माणूस आहे, माझ्याकडे तुमच्या सारखे बंगले, फ्लॅट, शेत्या नाहीत, त्यामुळे माझी काळजी करू नका, पाहिजे तर माझी चौकशी करा. पण तुमचे पुढे काय होईल हे बघा, असे आव्हानच खैरे यांनी शिरसाटांना दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in