शिवसेना आमदाराच्या घरावजवळ अवैध धंदे, भाजप आमदाराचा आरोप व आमरण उपोषण

(Bjp Mla Tanhaji Mutkule Blame Shivsena Mla) कुठल्या नंबरवरून देवाणघेवाण होते याच्या पुराव्या दाखल काही चिठ्ठ्या देखील माध्यमांना दाखवल्या.
शिवसेना आमदाराच्या घरावजवळ अवैध धंदे, भाजप आमदाराचा आरोप व आमरण उपोषण
Bjp Mla Tanhaji Mutkule HingoliSarkarnama

हिंगोली : भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात उपोषण सुरू केले आहे. जिल्ह्यात अवैध वाळू, दारू, गुटखा सर्रास सुरू असून या माफियांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. परंतु ही मागणी करत असतांनाच त्यांनी शिवसेना आमदाराच्या घराजवळच अवैध धंदे सुरू असल्याचा खळबळजनक आरोप केला.

भगव्या आड राहून अवैध धंदे करणाऱ्यांचा निषेध व्यक्त करत त्यांनी नाव न घेता कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात कालच गुटखा प्रकरणात शिवेसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. हे प्रकरण तापलेले असतांनाच आज हिंगोलीत देखील जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात भाजप आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.

विशेष म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्यामागे देखील शिवसेनेच्याच आमदाराचा हात असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी केला आहे. जिल्हा प्रशासनाच्या विरोधात उपोषण सुरू केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना मुटकुळे यांनी हे आरोप करत मटका कसा घेतला जातो, कुठल्या नंबरवरून देवाणघेवाण होते यांच्या पुराव्या दाखल काही चिठ्ठ्या देखील माध्यमांना दाखवल्या.

नुकत्याच मुंबईत झालेल्या भाजप प्रदेश कार्यकारणी बैठकीत राज्यातील महाविकास आघाडीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता राज्यभरात भाजपच्या वतीने आंदोलनाला सुरूवता झाल्याचे पहायला मिळते आहे. हिंगोली जिल्ह्यात देखील अशा आंदोलनाला सुरूवात झाली असून अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी करत भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी आज हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केले.

जिल्ह्यात रेती, गुटखा , व अवैध विक्री होणारी देशी दारू रोखण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. दरम्यान पोलीस प्रशासनाने मात्र जिल्ह्यात कुठेही अवैध व्यवसाय सुरू नसल्याचे सांगितले आहे, तसेच नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यास तातडीने कारवाई करू असे देखील स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे आमदार मुटकुळे यांनी शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

Bjp Mla Tanhaji Mutkule Hingoli
नाना पटोले थेट देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

भगव्याच्या आड राहून अवैध धंदे करणाऱ्यांचा जाहीर निषेध अशा घोषणा मुटकुळे व भाजपच्या आंदोलकांनी उपोषणस्थली दिल्या. अवैध धंदे मोबाईल वरून केल्या जातात, ज्या मोबाईल नंबरवरून मटका घेतल्या जातो आणि ज्या नंबर वर ऑनलाईन मटक्याचे पेमेंट होते तो नंबर मुटकुळे यांनी जाहीर करत चौकशीची मागणी केली. एवढ्यावरच न थांबता शिवसेना आमदाराच्या घराजवळ अवैध धंदे सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in