Sandmafiya News In Latur District
Sandmafiya News In Latur DistrictSarkarnama

Latur : तहसिलदार लाचेच्या जाळ्यात अडकल्यानंतर वाळू घाटावर लवकरच १४४ कलम..

ज्या भागात वाळूचा बेकायदा उपसा व वाहतुक सुरू आहे त्या भागातील मंडळआधिकारी व तलाठ्यावारही कारवाई केली जाणार आहे. (SandMafiya)

निलंगा : मांजरा व तेरणा नदीपात्रातील कांही ठराविक घाट महसूल विभागाच्या निशाण्यावर आले असून तालुक्यातील संवेदनाशील असलेल्या वाळू घाटावर १४४ कलम (जमावबंदी आदेश ) लावण्याच्या महसूल विभागाने हलचाली सुरू केल्या आहेत. (Latur) यामुळे वाळू माफीयाचे (SandMafiya) धाबे दणाणले असून वाळूमाफीयाचा बिमोड करण्यासाठी महसूल विभागाने आता अतिशय कठोर पावले उचलण्यास सुरवात केल्याचे दिसते.

तालुक्यातून मांजरा व तेरणा या दोन नद्या वाहतात, सध्या नदीपात्रात पाणी असल्याने बोटीद्वारे वाळूचा बेकायदा उपसा राजरोसपणे सुरू आहे. (Marathwada) मोठ्या प्रमाणात वाळूचे साठे करून ठेवण्यात आले आहेत. याबाबत अनेकवेळा कारवाई करण्यासाठी महसूल विभागाला मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बेकायदा वाळू उपसा व वाहतुकीला लगाम लावण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी कठोर पावले उचलली आहेत.

तहसीलदार गणेश जाधव यांना वाळू व्यवसाय करणाऱ्यांकडून दीड लाखाची लाच घेताना झालेली अटक महसूल विभागाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी निलंगा येथील उपविभागीय कार्यालयात चार दिवसापूर्वी बैठक घेऊन असा लाजीरवाणा प्रकार होऊ नये याची काळजी घेत वाळूची सुत्रे स्वतःकडे घेतली आहेत. पुढील काळात वाळूच्या प्रत्येक हालचालीवर नजर रहाणार असून बेकायदा वाळू उपसा व वाहतुकीला लगाम घालण्यासाठी मंडळआधिकारी व तलाठी यांना घाटाच्या ठिकाणचा आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.

वाळू उपशाच्या ठिकाणांचा शोध घेऊन तेथून कोणत्याही स्थितीत बेकायदा वाळू उपसा व वाहतुक होणार नाही यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. याबाबतची संपूर्ण जबाबदारी उपविभागीय आधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. महसूल विभागाची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मांजरा व तेरणा नदीपात्रातील संवेदनाशील वाळू घाटाची माहीती मागवण्यात आली असून लवकरच या ठिकाणी १४४ कलम लागू (जमावबंदी आदेश ) लागू करण्याच्या हालचाली महसूल विभागाने सुरू केल्या आहेत.

Sandmafiya News In Latur District
Beed : विनायक मेटे प्रथमच सत्ता अन् आमदारकीविना ; त्यात ‘स्थानिक स्वराज्य’ च्या निवडणुका तोंडावर..

शिवाय नदीपात्राच्या बाजूला काढून साठवणूक करून ठेवलेली वाळूही जप्त करण्यात येणार आहे. तालुक्यातील नदीपात्रात वाढलेल्या बोटी हा चिंतेचा विषय झाला आहे. ज्या भागात वाळूचा बेकायदा उपसा व वाहतुक सुरू आहे त्या भागातील मंडळआधिकारी व तलाठ्यावारही कारवाई केली जाणार आहे. यासाठी नदीपात्राच्या अधिकाऱ्यांना वाळू साठवणूक व वाहतुकीची लपवून ठेवलेली माहीती महागात पडणार आहे. निलंग्याचे तहसीलदार गणेश जाधव यांच्यावर अँन्टीकरफ्शनच्या कारवाईमुळे प्रशासन हादरून गेले आहे.

आता निलंग्याचा पदभार कोणाकडे जाणार याबाबत कांही दिवसापासून उत्सूकता होती. त्यातच देवणीचे तहसीलदार सुरेश घोळवे यांच्याकडे निलंगा तहसीलदार म्हणून शुक्रवारी अतिरीक्त पदभार देण्यात आला आहे. कडक, शिस्तप्रिय आधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे. देवणी तालुक्यात त्यांनी अनेक वाळूमाफीयांवर कठोर कारवाई केल्याने अशा काळात त्यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आल्याने अवैध वाळू वाहतूक व उपशाला लगाम बसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com