Tanajai Sawant, Dnyaneshwar Patil
Tanajai Sawant, Dnyaneshwar PatilSarkarnama

Tanaji Sawant News: खुमखुमी असेल तर राजीनामा द्या, डिपॉझिट जप्त करू; पाटलांचा सावंताना इशारा

Dnyaneshwar Patil: राहुल मोटे यांनाही सावंतांचा पाठिंबा न घेण्याची सूचना

Marathwada News: तानाजी सावंत शिवसेनाप्रमुख आणि जनतेच्या आशिर्वादामुळे परंडा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी खुमखूमी असेल तर आमदारकीचा राजीनामा द्यावा, पुन्हा निवडणुकीला उभे राहावे. त्यांचे डिपोझिट जप्त करणार. त्यांना कसल्याही स्थितीत निवडून येऊ देणार नाही. ही काय आजची स्थिती नाही तर कधीही लढायला तयार आहे, असा इशारा ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी दिला आहे.

ठाकरे गटाचे परंडा (Paranda) मतदारसंघातील माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावरुन अपात्र ठरविण्यात आले आहे. यासाठी पुण्यातील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना कारस्थान रचले. ७ फेब्रुवारी रोजी तारीख ठेवलेली असताना, त्याची नोटीस १० फेब्रुवारी रोजी दिली. विविध मार्गाने कुटुंबास त्रास दिल्याचा आरोप पाटील यांनी पत्रकार परिषदेत सावंत यांच्यावर केले आहेत.

Tanajai Sawant, Dnyaneshwar Patil
Raju Shetti : ‘चोरमंडळ’ने शेतकऱ्याला विधानसभेतून गायब केले; पण शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणाऱ्यांनी एवढी गोष्ट करावीच’

यावेळी ज्ञानेश्वर पाटील (Dnyaneshwar Patil) यांनी तालुक्यातील जनतेच्या विरोधात जाऊन सावंत (Tanaji Sawant) यांना निवडून आणण्याचे काम केले. त्यांच्यावरच उलटल्याचा आरोप सांवत यांच्यावर केला. पाटील म्हणाले, "ज्या माणसाने तुम्हाला निवडून आणले, सामान्य माणसांना समजावून सांगितले, या तालुक्यातील सर्व लोकांचा विरोध पत्कारला, त्यांच्याविरोधात कारस्थान केले. जनता सावंतांना तालुक्यात फिरू देत नव्हती. असे असतानाही त्यांना निवडून आणले. मग तुमची कुठली जात? तुमची कुठली नितीमत्ता? तुमच्यात खुमखुमी असेल तर स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा द्या अन या मैदानात मग तुमची पाठ थोपटतो."

Tanajai Sawant, Dnyaneshwar Patil
Rahul Gandhi News : संघाची तुलना 'मुस्लीम ब्रदरवूड'शी : राहुल गांधींच्या विधानाने भाजप आक्रमक!

पाटील यांनी भैरवनाथ कारखान्यावरूनही सावंत यांना इशारा दिला आहे. तसेच माढ्याचे पार्सल माघारी पाठविणार असल्याचेही वक्तव्य पाटील यांनी यावेळी केले. पाटील म्हणाले, "या तालुक्यात काम करताना हा भैरवनाथ कारखाना कसा उभारला? कुणाच्या जमिनी घेतल्या? त्यासाठी काय केले, त्याबाबत निश्चितपणे कालांतराने सांगणार आहे. मला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या माध्यमातून आमदारकी मिळाली होती. आता आलेले पार्सल शंभर टक्के माघारी कसे जाईल, हे माझे काम आहे. कुणीही सावंतांनी पाठिंबा दिला तरी घेऊ नका. दहा वर्षे आमदार राहिलेले राहुल मोटे (Rahul Mote) यांनी सावंत यांचा पाठिंबा घेणे म्हणजे मोटे यांचा कमीपणा आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com