किराणा दुकानातून वाईन विकणार असाल, तर मग गांजाच्या शेतीलाही परवानगी द्या..

राज्याचे मंत्री नवाब मलिका यांच्या जावायाने हर्बल तंबाखूच्या नावाखाली गांजाचा व्यवहार केलाच आहे. मग शेतकऱ्यांना गांजाची शेती करायला परवानगी देण्यास काय हरकत आहे? (Mp Pratap Patil Chikhlikar)
Mp Pratap Patil Chikhlikar, Nanded
Mp Pratap Patil Chikhlikar, NandedSarkarnama

नांदेड : राज्यातील सरकारला भीक लागली आहे, उत्पन्न वाढवण्याच्या नावाखाली माॅल, किराणा दुकानातून वाईन विकण्याची परवानगी यांनी दिली आहे. (Nanded) हा निर्णय महाराष्ट्राचं वाटोळ करणारा आहे. (Bjp) मग तुम्ही वाईन विकण्याची परवानगी देणार असाल तर तुमचे मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाने मध्यंतरी जो हर्बल तंबाखूचा व्यवहार मध्ये केला, थोडक्यात गांजाचा तर मग शेतकऱ्यांना गांजा पिकवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Mp Pratap Patil Chikhlikar) यांनी केली आहे.

प्रसार माध्यमांशी बोलतांना राज्यात माॅल आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला राज्य सरकारने परवानगी दिल्याच्या निर्णयावर त्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. चिखलीकर म्हणाले, हा निर्णय दुर्दैवी आणि राज्याचं वाटोळं करणारा आहे. उत्पन्न वाढीच्या नावाखालीर जर वाईन विक्रीला परवनागी देणार असाल तर गांजाच्या शेतीतून अधिक उत्पन्न सरकारला मिळू शकेल. मग राज्यात गांजाची शेती करायला देखील परवानगी द्या.

राज्याचे मंत्री नवाब मलिका यांच्या जावायाने हर्बल तंबाखूच्या नावाखाली गांजाचा व्यवहार केलाच आहे. मग शेतकऱ्यांना गांजाची शेती करायला परवानगी देण्यास काय हरकत आहे? असा सवालही चिखलीकर यांनी केला. राज्यातील माॅल आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय नुकताच महाविकास आघाडी सरकारने घेतला. यावरून विरोधी पक्ष भाजप सरकारवर तुटून पडला आहे.

Mp Pratap Patil Chikhlikar, Nanded
आमच्या आया-बहिणी रस्त्यावर पडल्यात का? `बायको पाहिजे`चे पोस्टर भाजपने फाडले..

महाराष्ट्राला मद्यराष्ट्र होऊ देणार नाही, असे म्हणत माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सरकारवर सडकून टीका केली आहे. एवढेच नाही तर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा संबंध थेट वाईन निर्मिती कंपनीशीच लावला. त्यानंतर आता खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी गांजाच्या शेतीला परवानगी मागत सरकारला धारेवर धरले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com