Aurangabad : निधी नव्हता तर मग निविदा का काढल्या ? मंत्री होताच सावे अ‍ॅक्शन मोडमध्ये..

शहरातील ३१७ कोटींच्या १०८ रस्त्यापैकी २२ रस्ते करण्याचा निर्णय घेत सीईओ डॉ. अभिजित चौधरी यांनी इतर कामांना स्थगिती दिली आहे. (Minister Atul save)
Minister Atul Save-Dr.Bhagwat Karad in Smart City Meeting News
Minister Atul Save-Dr.Bhagwat Karad in Smart City Meeting NewsSarkarnama

औरंगाबाद : स्मार्ट सिटी अभियानात निधीची तरतूद नव्हती तर ३१७ कोटींच्या १०८ रस्ते कामांची निविदा का काढली? आता ८४ रस्त्यांची कामे तुम्ही थांबविली, ही फसवणूक आहे. (Aurangabad) आम्ही गुन्हेही दाखल करू शकतो, अशा शब्दात राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी शनिवारी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता.२०) स्मार्ट सिटी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत (Smart City) स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेले विविध प्रकल्प, नवीन पाणी पुरवठा योजना व प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर कामांचा आढावा घेण्यात आला.

शहरातील ३१७ कोटींच्या १०८ रस्त्यापैकी २२ रस्ते करण्याचा निर्णय घेत सीईओ डॉ. अभिजित चौधरी यांनी इतर कामांना स्थगिती दिली आहे. त्यावर डॉ. कराड व सावे यांनी नाराजी व्यक्त केली. निधी नव्हता तर मग निविदा कशाला काढली.

क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन या रस्त्यावर सायकल ट्रॅक तयार करण्यात आला. पण सध्या या ट्रॅकची काय अवस्था आहे? असा प्रश्‍न करत या कामावरही संशय व्यक्त करण्यात आला. शहर विकासासाठी जी मदत हवी आहे ती करण्यास आम्ही तयार आहोत.

Minister Atul Save-Dr.Bhagwat Karad in Smart City Meeting News
Yuvasena : बांगर पुन्हा निवडून आले तर सगळी संपत्ती दान करील, भिक्षा मागून जगेन..

महापालिकेने संधीचा फायदा घ्यावा, असे यावेळी डॉ. कराड आणि सावे यांनी सांगितले. बैठकीला स्मार्ट सिटीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पण सीईओ तथा महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी हे हजर नव्हते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com