Ambadas Danve : सरकारचा असाच ताठपरणा राहिला तर राज्यातील यंत्रणा कोलमडेल..

Shivsena : 'अदानी ग्रुप'ला राज्यात वीज वितरण परवाना देण्यास महावितरणचा विरोध आहे. खासगीकरणाचे असे प्रयोग यापूर्वी फसले आहेत
Opposition Leader Ambadas Danve  News
Opposition Leader Ambadas Danve NewsSarkarnama

Marathwada News : राज्यात सुरू असलेला डाॅक्टरांचा संप मार्डने अखेर मागे घेतला. छोट्या मोठ्या मागण्यांसाठी डाॅक्टरांना रस्त्यावर उतरावे लागत आहे, पण सरकार आपला ताठरपणा सोडायला तयार नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली होती.

Opposition Leader Ambadas Danve  News
Teachers Constituency : कामात बेजबाबदारपणा खपवून घेणार नाही, आठ दिवसांनी पुन्हा येईन..

तीन तासापुर्वी दानवे यांनी ट्विट करत महावितरण आणि मार्डच्या आंदोलनावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. (Shivsena) मार्डचा संप मिटला असला तरी महावितरणचे कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. (Marathwada) या पार्श्वभूमीवर दानवे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

दानवे म्हणाले, राज्यातील वीज वितरण सांभाळणारी 'महावितरण' तीन दिवसांचा संप पुकारत आहे. कारणही खासच आहे. 'अदानी ग्रुप'ला राज्यात वीज वितरण परवाना देण्यास महावितरणचा विरोध आहे. खासगीकरणाचे असे प्रयोग यापूर्वी फसले आहेत, यातून सरकारने धडा घेऊन मार्ग काढावा. महावितरण वाचली पाहिजे.

दुसरीकडे राज्यातील सात हजारांहून अधिक डॉक्टर (मार्ड) संपावर आहेत. छोट्या छोट्या मागण्या घेऊन आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांशी साधी चर्चा करायला सरकार तयार नाही. प्रश्न सोडवणे तर लांबच, असाच ताठरपणा सरकारचा राहिला तर राज्याची आरोग्य यंत्रणा कोलमडण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा देखील दानवे यांनी ट्विटच्या माध्यमातून दिला होता. दरम्यान, मार्डच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन सरकाकडून देण्यात आल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com